fbpx
Tuesday, January 26, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चेन्नई विरुद्ध राजस्थानच्या आजच्या सामन्यात ‘या’ दोन भावात होईल टक्कर

September 22, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


मुंबई । आयपीएलमध्ये आज संध्याकाळी दोन मजबूत संघात मोठा सामना होणार आहे. एकीकडे चेन्नई सुपर किंग्जचा संघ असेल, ज्यांनी विजयासह आयपीएलमध्ये प्रारंभ केला आणि दुसरीकडे पहिला सामना खेळणार असलेल्या राजस्थान रॉयल्सचा संघ. चांगली बातमी अशी आहे की, राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ तंदुरुस्त आहे आणि आजच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता आहे.

चेन्नईच्या संघात सॅम करन आणि राजस्थानच्या संघात टॉम करनचा समावेश आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये दोघांनाही स्थान मिळाल्यास आज भाऊ-भाऊ आपसांत भिडताना दिसू शकतात.

चेन्नईचा कर्णधार आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल करत नाही. त्यामुळे चेन्नई संघ मुंबईविरुद्ध खेळविण्यात आलेला संघच राजस्थानविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. राजस्थान आपल्या पहिला सामन्यात मजबूत प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरवण्याच्या विचारात आहे. या संघात अष्टपैलू बेन स्टोक्स आणि फलंदाज जोस बटलर नाहीत. परंतु असे असूनही संघ खूप मजबूत दिसत आहे.

अनुभवी रॉबिन उथप्पा व युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल संघाला वेगात सुरुवात करुन देण्यासाठी मैदानात उतरतील. कर्णधार स्मिथबरोबर मधल्या फळीत स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर आणि संजू सॅमसन असतील. गोलंदाजीही संघासाठी बरीच मजबूत असून जोफ्रा आर्चर आणि जयदेव उनाडकट, वरुण ऍरॉन किंवा अंकित राजपूत यांना संधी दिली जाऊ शकते. अष्टपैलू म्हणून टॉम करन आणि श्रेयस गोपाल संघात असतील.

चेन्नई संघ आपल्या विजयी संघासह उतरेल अशी अपेक्षा आहे. अंबाती रायडूने अनुभवी सुरेश रैनाची जागा भरुन काढली. त्याने मोठी फटकेबाजी करत मुंबईविरुद्ध सामना फिरवला.

तर फिरकीपटू पीयूष चावलाने हरभजनची उणीव भासू  दिली नाही. वेगवान गोलंदाजीत दीपक चाहर आणि सॅम करन हे युवा खेळाडू असतील.

राजस्थानचा संभाव्य संघ-

यशस्वी जयस्वाल, रॉबिन उथप्पा, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड मिलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), टॉम करन, रियन पराग, श्रेयस गोपाळ, जोफ्रा आर्चर, जयदेव उनादकट, अंकित राजपूत किंवा वरुण एॅरोन

चेन्नईचा संभाव्य संघ-

मुरली विजय, शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस, अंबाती रायडू, केदार जाधव, एमएस धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, सॅम कुर्रान, दीपक चहर, पीयूष चावला, लुंगी एंगिडी

महत्त्वाच्या बातम्या-

-‘या’ अष्टपैलू खेळाडूला गोलंदाजी करताना झाली दुखापत; सोडावे लागले मैदान

-या स्टार खेळाडूंची प्लेयिंग इलेव्हनमध्ये निवड न केल्यामुळे हैद्राबाद संघाला बसला फटका

-हैद्राबाद विरुद्ध बेंगलोर संघातील सामन्यात झाली तब्बल एवढ्या विक्रमांची नोंद; घ्या जाणून

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारे सर्वात युवा ४ फलंदाज

-पंजाबविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दिल्लीचे ‘हे’ ५ खेळाडू खेळले नसते तर काही खरं नव्हतं

-विराट कोहली-डेव्हिड वॉर्नरच्या संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन, पहा कुणाला मिळेल जागा


Previous Post

‘या’ अष्टपैलू खेळाडूला गोलंदाजी करताना झाली दुखापत; सोडावे लागले मैदान

Next Post

धोनी, रोहित आणि गंभीरनंतर आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा विराट बनला चौथा कर्णधार

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@ICC
क्रिकेट

“टी२० मालिका विजयानंतर विराटच्या ‘त्या’ कृत्याने डोळ्यात पाणी आणलं”, नटराजनने व्यक्त केल्या भावना

January 26, 2021
Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

“इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ‘ही’ गोष्ट केल्यास अर्धी मिशी काढेन”, अश्विनचं पुजाराला अनोखं चॅलेंज 

January 26, 2021
Photo Courtesy: www.iplt20.com
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ ठिकाणी होणार लिलाव

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

January 25, 2021
टॉप बातम्या

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

January 25, 2021
टॉप बातम्या

‘बाऊंसर’ चेंडूवर येणार बंदी ? ‘हे’ आहे कारण

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ IPL

धोनी, रोहित आणि गंभीरनंतर आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा विराट बनला चौथा कर्णधार

Photo Courtesy: Twitter/IPL

किंग्ज इलेव्हन पंजाबने एकदा गाठली होती अंतिम फेरी, या वेळी होणार विजेता...?

Photo Courtesy: Twitter/DelhiCapitals

५ असे खेळाडू, जे आयपीएलमध्ये झालेत सर्वाधिक वेळा रनआऊट

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.