fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या स्टार खेळाडूंची प्लेयिंग इलेव्हनमध्ये निवड न केल्यामुळे हैद्राबाद संघाला बसला फटका

Rcb vs srh rcb defeated sunrisers by 5 runs because of david warners mistake

September 22, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) यांच्यात आयपीएल 2020 चा तिसरा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. उत्कृष्ट कामगिरीमुळे आरसीबी संघाने हा सामना 10 धावांच्या फरकाने जिंकला. हा सामना जिंकल्यामुळे या संघाला गुणतालिकेत 2 महत्त्वपूर्ण गुण मिळाले आहेत.

सनरायझर्स हैदराबादने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबी संघाची सलामीची भागीदारी उत्कृष्ट होती, पदार्पण करत असलेल्या युवा फलंदाज डेवदत्त पडिक्कल आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा फलंदाज ऍरॉन फिंचने पहिल्या विकेटसाठी 11 षटकांत 90 धावांची शानदार भागीदारी केली.

आरसीबीने 123 धावांमध्ये 3 गडी गमावले होते. असले तरी, शेवटी एबी डिविलियर्सने चांगली फटकेबाजी केली आणि आरसीबी संघाची धावसंख्या 20 षटकांत 5 बाद 163 धावापर्यंत पोहोचवण्यात मोलाची कामगिरी केली.

आरसीबीकडून पदार्पण सामना खेळत असलेल्या देवदत्त पडीक्कलने 42 चेंडूत 56 धावा केल्या. त्यानंतर एबी डिविलियर्सने 30 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. या सामन्यात कर्णधार विराट कोहली काही खास कामगिरी करू शकला नाही आणि केवळ 14 धावा करून तो बाद झाला.

त्याचबरोबर हैद्राबाद संघाकडून टी नटराजन, अभिषेक शर्मा आणि विजय शंकरने प्रत्येकी 1-1 गडी बाद केले.

हैद्राबाद संघ करू शकला केवळ 153 धावा

प्रत्युत्तरात सनरायझर्स हैद्राबाद संघाने लक्षाचा पाठलाग करतांना खूपच खराब कामगिरी केली. सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर ( 6 धावा) नॉन स्ट्रायकर एन्डवर असतांना क्रीजच्या बाहेर आला. फलंदाजाने मारलेला चेंडू रोखतांना गोलंदाजी करत असलेल्या उमेश यादवचा स्पर्श चेंडूला झाला व चेंडूने त्रिफळा उडविल्या. यामुळे डेव्हिड वॉर्नर धावबाद झाला. त्यानंतर फलंदाज मनीष पांडे आणि इंग्लंड क्रिकेट संघाचा फलंदाज जॉनी बेयरस्टो यांनी 71 धावांची भागीदारी केली.

तथापि, या भागीदारीनंतर हैद्राबादचा डाव पूर्णपणे गडबडला आणि संपूर्ण संघ 19.4 षटकांत 153 धावांवर बाद झाला. सनरायझर्स हैद्राबादकडून 43 चेंडूत 61 धावांची सर्वाधिक खेळी जॉनी बेयरस्टोने याने केली. त्याचबरोबर मनिष पांडेने संघाकडून 33 चेंडूत 34 धावा केल्या आहेत.

फिरकीपटू युझवेंद्र चहलने आरसीबीकडून शानदार गोलंदाजी केली आणि 4 षटकांत केवळ 18 धावा देऊन एकूण 4 बळी घेतले.

या सामन्यात हैद्राबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्लेयिंग इलेव्हनमध्ये फलंदाज केन विलियम्सन आणि अष्टपैलू मोहम्मद नबीसारख्या स्टार खेळाडूंची निवड केली नव्हती. ज्याचा फटका सनरायझर्स संघाला बसला आणि पराभवाचा सामना करावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या-

-हैद्राबाद विरुद्ध बेंगलोर संघातील सामन्यात झाली तब्बल एवढ्या विक्रमांची नोंद; घ्या जाणून

-‘या’ दिवशी करोडो भारतीयांना विराट कोहलीसह मिलिंद सोमण देणार फिटनेस मंत्र

-थ्री डायमेंशन खेळाडू ठरला फ्लॉप; सोशल मीडियावर थ्री डी मिम्स होतायेत व्हायरल

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारे सर्वात युवा ४ फलंदाज

-पंजाबविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दिल्लीचे ‘हे’ ५ खेळाडू खेळले नसते तर काही खरं नव्हतं

-विराट कोहली-डेव्हिड वॉर्नरच्या संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन, पहा कुणाला मिळेल जागा


Previous Post

राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज होणार भिडंत; वाचा सामन्याबद्दल सविस्तर माहिती

Next Post

‘या’ अष्टपैलू खेळाडूला गोलंदाजी करताना झाली दुखापत; सोडावे लागले मैदान

Related Posts

Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

‘या’ भारतीय खेळाडूची कामगिरी ठरवेल भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा विजेता?, इंग्लंडच्या दिग्गजाचे भाकीत

January 28, 2021
Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

ब्रिस्बेन कसोटीत वेगवान बाउंसर टाकल्याने शार्दुलला चेतावणी देणाऱ्या अंपायरची निवृत्ती, ‘अशी’ राहिली कारकिर्द

January 28, 2021
Photo Curtsey: Facebook/Khrievitso Kense
IPL

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ‘या’ पठ्ठ्याने जिंकल मुंबई इंडियन्सचं मन, गाजवणार आयपीएल २०२१चा हंगाम ?

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ englandcricket
क्रिकेट

स्मिथची शिकार केली आता जो रूटचा नंबर; भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकाचे इंग्लंडच्या कर्णधाराला आव्हान

January 28, 2021
Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

कागिसो रबाडाचे कसोटी विकेट्सचे ‘द्विशतक’, दिग्गजांच्या मांदियाळीत मिळवली टॉप-५ मध्ये जागा

January 28, 2021
क्रिकेट

“अविवाहित खेळाडूंपेक्षा विवाहित खेळाडूंचे बायो-बबलमध्ये राहणे जास्त अवघड”, ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे भाष्य

January 28, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/Sunrisers

'या' अष्टपैलू खेळाडूला गोलंदाजी करताना झाली दुखापत; सोडावे लागले मैदान

Photo Courtesy: Twitter/IPL

चेन्नई विरुद्ध राजस्थानच्या आजच्या सामन्यात 'या' दोन भावात होईल टक्कर

Photo Courtesy: Twitter/ IPL

धोनी, रोहित आणि गंभीरनंतर आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा विराट बनला चौथा कर्णधार

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.