जसप्रीत बुमराहसह मुंबई इंडियन्सचे सर्वच खेळाडू सध्या आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी सरावात गुंतलेले आहेत. अशातच मुंबईचे खेळाडू सराव करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये मुंबईचा वेगवान गोलंदाज बुमराहने ६ वेगवेगळ्या गोलंदाजांच्या शैलीत गोलंदाजी केली आहे. बुमराह नेटमध्ये सराव करताना काही गोलंदाजांची नक्कल करत चेष्टा मस्करी करताना दिसत आहे, तर संघातील अन्य खेळाडू त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत.
बुमराहचा हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर करत म्हटले आहे की, “तुम्ही काही अंदाज लावू शकता का?” म्हणजेच या व्हिडिओमध्ये बुमराहने कोणत्या गोलंदाजांची नक्कल केली आहे याबद्दल त्यांनी विचारले आहे.
बुमराहाने ज्या गोलंदाजांची नक्कल केली आहे. त्यांच्याबद्दल पूर्णपणे तर सांगितले जाऊ शकत नाही. परंतु आपण अंदाज लावू शकतो. अंदाजे या व्हिडिओमध्ये लसिथ मलिंगा, ग्लेन मॅकग्रा, रवींद्र जडेजा, केदार जाधव, राशीद खान आणि अनिल कुंबळे या गोलंदाजांची नक्कल केली गेली आहे, तर याच व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करताना दिसत आहे.
📹 Can you guess all 6️⃣ bowlers Boom is trying to imitate? 🤔
PS: Wait for the bonus round 😉 #OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @Jaspritbumrah93 pic.twitter.com/RMBlzeI6Rw
— Mumbai Indians (@mipaltan) September 7, 2020
मुंबई इंडियन्सचा संघ सध्या आबुधाबी मध्ये सराव करत आहे. आयपीएलचा पहिला सामना याच शहरात होणार आहे. पहिल्या सामन्यात गतविजेती मुंबई इंडियन्स धोनीच्या महारथींशी म्हणजेच चेन्नई सुपर किंग्जशी १९ सप्टेंबरला भिडणार आहे.
मुंबईच्या तुलनेत चेन्नईचा सराव खूपच कमी झाला आहे. कारण संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे संघातील सदस्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. मुंबई गतविजेता असल्यामुळे यावेळी त्यांच्यावर जास्त दबाव असणार आहे. त्यातच अनुभवी लसीथ मलिंगा या हंगामातून बाहेर गेल्यामुळे गोलंदाजीची पूर्णपणे जबाबदारी ही बुमराहच्या खांद्यावर येऊन पडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबईचा कर्णधार रोहितची २ वर्षाची मुलगी आहे खूपच हुशार, पहा व्हिडिओ
-सतत पराभव पाहणाऱ्या आरसीबीच्या कर्णधार कोहलीने केले मोठे वक्तव्य
-केकेआरचा ‘तो’ नवा खेळाडू आहे केविन पीटरसनपेक्षाही खतरनाक, यावेळी करणार…
ट्रेंडिंग लेख-
-मिस्टर आयपीएल रैनाच्या जागी हे ४ खेळाडू बनतील चेन्नई संघाचे उपकर्णधार
-रोहित-धोनी नव्हे तर ‘हे’ ३ क्रिकेटर्स आयपीएल २०२०मध्ये पटकावतील सर्वाधिक षटकार मारण्याचा अवॉर्ड
-लिलावात न विकले गेलेले ‘हे’ ५ भारतीय क्रिकेटर्स म्हणु शकतात ‘मी पुन्हा येईन’!