---Advertisement---

फिल्डर फिल्डींगमध्ये अडथळा आणला, म्हणून बाद दिला गेलेला जगातील पहिला क्रिकेटर

---Advertisement---

क्रिकेटमध्ये आपण सहसा फलंदाज त्रिफळाचीत, झेलबाद, पायचीत ,धावबाद, यष्टीचीत या पद्धतीने बाद होताना पाहतो. मात्र, एक फलंदाज क्रिकेटमध्ये तब्बल दहा पद्धतीने बाद होऊ शकतो. वर नमूद केलेल्या प्रमुख बाद होण्याच्या पद्धती शिवाय, हिटविकेट,‌ क्षेत्ररक्षकाला अडथळा आणला म्हणून, दोनदा चेंडू मारला म्हणून, रिटायर्ड हर्ट व टाईम आउट या पद्धतीनुसार फलंदाज बाद होऊ शकतो.

याचपैकी, क्षेत्ररक्षकाला अडथळा आणला गेला म्हणून फलंदाजाला बाद दिल्या गेलेल्या, पहिल्या घटनेविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सर लेन हटन हे इंग्लंडचे महान सलामीवीर म्हणून ओळखले जातात. सर पदवी लाभलेल्या हटन यांच्याच नावे सर्वप्रथम क्षेत्ररक्षकाला अडथळा आणला म्हणून बाद होण्याचा नकोसा विक्रम आहे. १९५१ मध्ये ओव्हलच्या मैदानावर आजच्या दिवशी द. आफ्रिकेविरुद्ध त्यांना अशाप्रकारे बाद देण्यात आले होते.

काय आहे नियम ?

मेरीलेबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) ने तयार केलेल्या क्रिकेट नियमावलीतील कलम ३७ नुसार, खालील परिस्थितीत फलंदाज क्षेत्ररक्षणात अडथळा आणत असेल तर, त्याला बाद देण्यात येते.

कलमात नमूद केल्याप्रमाणे, “जर एखादा फलंदाज आपल्या शब्द किंवा कृतीतून क्षेत्ररक्षणात बाधा आणण्यासाठी किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे लक्ष विचलित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असेल तर, त्याने मैदानात अडथळा आणला असे गृहीत धरले जाते. कोणताही फलंदाज चेंडू मारल्यानंतर, बाद होण्याचे टाळण्यासाठी पुन्हा चेंडू हाताळू शकत नाही.
कलम ३३.१ नुसार,

१) फलंदाजाला धाव धावताना‌ हाताने चेंडू अडवता येत नाही. दुखापतींपासून वाचण्यासाठी जर जाणीवपूर्वक चेंडू अडवला असेल तर पंच व सामनाधिकारी त्यावर निर्णय घेत असतात.

२) दुखापती टाळण्यासाठी शक्य तिथे बॅटचा वापर करावा. त्याव्यतिरिक्त कोणत्याही अवयवाने चेंडू अडविण्यास परवानगी नाही.

ती घटना

१९५१ साली द. आफ्रिका संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. इंग्लंडच्या संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती. मालिकेतील अखेरचा पाचवा सामना ओव्हलच्या मैदानावर होता. द. आफ्रिकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. द. आफ्रिकेने पहिल्या डावात २०२ धावा उभारल्या. जिम लेकर यांनी इंग्लंडसाठी चार बळी मिळवले. इंग्लंडचा पहिला डाव १९३ धावांवर संपला. द. आफ्रिकेचा दुसरा डावही गडगडला. त्यांना अवघ्या १५४ धावा करता आल्या. इंग्लंडला विजयासाठी १६३ धावांचे लक्ष्य मिळाले.

विजयासाठीचे १६३ धावांचे आव्हान पार करण्यासाठी, लेन हटन व फ्रॅंक लॉसन ही जोडी मैदानात उतरली. दोघांनी या कमी धावसंख्येच्या पाठलागात ५०+ धावांची सलामी देत विजयाकडे वाटचाल सुरू केली.

अशातच, एक चेंडू हटन यांच्या बॅटची कड घेऊन हवेत उडाला. द. आफ्रिकेचे यष्टीरक्षक विलियम इंडिन हे झेल घेण्यासाठी चेंडूच्या खाली आले. इतक्यात, हटन यांनी इंडिन व चेंडू यांच्या दरम्यान बॅट लावली. इंडिन यांच्या हाताला न लागता चेंडू खाली पडला. द. आफ्रिकेच्या खेळाडूंनी पंचांकडे दाद मागितली. पंचांनी नियमानुसार, हटन यांना बाद घोषित केले. अशाप्रकारे, सर लेन हटन यांच्या नावे क्षेत्ररक्षणात बाधा आणल्या कारणाने बाद होणारा पहिला फलंदाज, असा नामुष्कीजनक विक्रम जमा झाला.

हटन यांच्यानंतर हे फलंदाज झाले अशा पद्धतीने बाद

हटन यांच्यानंतर रमीझ राजा, मोहिंदर अमरनाथ, इंजमाम उल-हक, मोहम्मद हफिज, अन्वर अली व बेन स्टोक्स हे खेळाडू अशाप्रकारे बाद झाले आहेत. टी२० क्रिकेटमध्ये इंग्लंडचा जेसन रॉय या पद्धतीने बाद होणारा एकमेव फलंदाज आहे. महिला क्रिकेटमध्ये भारताची थिरूषा कामिनी ही एकमेव महिला क्रिकेटपटू क्षेत्ररक्षणात अडथळा आणण्याच्या कारणाने बाद झाली आहे.

ट्रेंडिंग लेख-

-आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीप: सर्वाधिक धावा व सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप-१० खेळाडू

-‘या’ ३ बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं सुरेश रैनाचे अफेयर, अनुष्कासोबतही होती चर्चा

-आयपीएल २०२०: आरसीबीसाठी असे असू शकतात सलामी जोडीचे ३ पर्याय

महत्त्वाच्या बातम्या-

-आयपीएलची ‘ड्रीम टायटल स्पाॅन्सर’ होण्यासाठी ड्रीम११ कंपनीने मोजले करोडो रुपये; घ्या जाणून रक्कम

-आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार, बघा रोहित-धोनीसोबत आहे कोणाचे नाव

-ठरलं तर: यावर्षीचा खेल रत्न पुरस्कार मिळणार या सलामीवीर क्रिकेटरला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---