आयपीएलमध्ये एका संघात एकावेळी केवळ ४ परदेशी खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते. अशा वेळी परदेशी खेळाडूंना मालिकेत जर फाॅर्म राखता आला नाही तर त्यांना लगेच संघाबाहेर पडावे लागते.
तरीही डेविड वाॅर्नर, ख्रिस गेल व एबी डिविलिर्ससारख्या महारथींनी या स्पर्धेत ४ हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
तर भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, शिखर धवन, एमएस धोनी, गौतम गंभीर, व राॅबीन उथप्पा या खेळाडूंनी ४००० पेक्षा अधिक धावा केला आहे.
सध्या अजिंक्य रहाणेच्या नावावर ३८२० धावा असून तो ११व्या स्थानावर आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू:
विराट कोहली: ५४१२ धावा (सामने- १७७)
सुरेश रैना: ५३८६ धावा (सामने- १९३)
रोहित शर्मा: ४८९८ धावा (सामने- १८८)
डेविड वार्नर: ४७०६ धावा (सामने- १२६)
शिखर धवन: ४५७९ धावा (सामने- १५९)
ख्रिस गेल: ४४८४ धावा (सामने- १२५)
एमएस धोनी: ४४३२ धावा (सामने- १९०)
राॅबीन उथप्पा: ४४११ धावा (सामने- १७७)
एबी डिवीलिर्स: ४३९५ धावा (सामने- १५४)
गौतम गंभीर: ४२१७ धावा (सामने- १५४)