क्रिकेटमध्ये कोणत्याही संघासाठी कर्णधाराची भूमिका फार महत्त्वाची असते. त्याचा पाठिंबा आणि विश्वास संघातील अन्य खेळाडूंसाठी महत्त्वाचा ठरत असतो. कर्णधारांच्या बाबतीत भारतीय क्रिकेट संघाचा इतिहास जबरदस्त आहे. आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय संघासाठी अनेक महान कर्णधार होऊन गेले. याच महान कर्णधारांपैकी एमएस धोनी हा एक महान आणि यशस्वी कर्णधार होता.
त्याने आपल्या कारकीर्दीत जवकजवळ १० वर्षे कर्णधार म्हणून काम केले. त्याच्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर तो संपूर्ण क्रिकेट जगतात प्रसिद्ध झाला. त्याने आपल्या कर्णधारपदाखाली आयसीसीच्या तीनही ट्रॉफी जिंकल्या आहेत. तसेच भारतीय संघाला कसोटीमध्ये नंबर एकचा संघ बनविला.
त्याच्या नेतृत्वाखाली खेळाडूंची कारकीर्द घडली आहे. अनेकदा धोनीने काही खेळाडूंवर होणाऱ्या टिकांनंतरही त्यांना पाठिंबा देत त्यांचा बचाव केला आहे. आज या लेखातही अशा ५ घटनांबद्दल आपण जाणून घेऊ जेव्हा धोनी खेळाडूंच्या खंबीरपणे पाठिशी उभा राहिला.
५. २०१२ च्या आशिया चषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध गोलंदाजांनी केली खराब कामगिरी पण…
एमएस धोनी आपल्या खेळाडूंच्या खराब कामगिरीनंतर संघासोबतच असतो. २०१२ च्या आशिया चषकामध्येही असेच काहीसे दिसले. आशिया चषक स्पर्धेत भारतीय गोलंदाजाच्या खराब गोलंदाजीचा फायदा घेत बांगलादेश संघाने २९० धावांचा टप्पा पार केला होता. भारतीय संघ बांगलादेशविरूद्ध पराभूत झाला. पण यानंतरही धोनीने आपल्या गोलंदाजांचा बचाव केला होता.
४. २०१४ टी-२० विश्वचषकामध्ये मध्ये धोनी आपल्या गोलंदाजांना घातले पाठिशी
२०१४ च्या आयसीसी टी-२० विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघामध्ये काही खास गोलंदाज नव्हते. त्या वेळी धोनीने निवडलेल्या गोलंदाजीच्या आक्रमणावद्दल खूप चर्चा झाली. परंतु धोनी आपल्या गोलंदाजीच्या पाठीशी कायम राहिला आणि याचा फायदा भारतीय संघाला झाला आणि संघ अंतिम फेरीपर्यंत पोचला.
३. २०१५ विश्वचषकामध्ये विराट कोहली झाला फ्लॉप पण…
ऑस्ट्रेलियामध्ये २०१५ च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकातील उपांत्य सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा पराभव झाला. त्या संपूर्ण स्पर्धेत विराट कोहलीची कामगिरी काही खास नव्हती. उपांत्य फेरी गमावल्यानंतर चाहत्यांनी कोहलीवर बरीच टीका केली पण धोनी कोहलीच्या बाजूने उभा राहिला.
२. २०१५ मध्ये सुरेश रैनाच्या खराब कामगिरीनंतरही धोनीने दिला पाठिंबा
भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज सुरेश रैनाला एमएस धोनीकडून खूप पाठिंबा मिळाला. एमएस धोनीने संपूर्ण कारकीर्दीत रैनाला जबरदस्त साथ दिली. २०१५ मध्ये असेच काही घडले. घरच्याच मैदानावरील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचा पराभव झाला. यात रैनाची कामगिरी काही चांगली झाली नव्हती, परंतु पुढे धोनीने त्याला संघात कायम ठेवले.
१. हार्दिक पंड्या २०१६ मध्ये पुन्हा संघात
हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह हे आज भारतीय क्रिकेट संघातील अत्यंत महत्त्वाचे खेळाडू आहेत. या दोन्ही खेळाडूंनी २०१६ मध्ये संघात पदार्पण केले होते. हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराहने चांगली कामगिरी केली पण टी-२० विश्वचषकात हार्दिक पांड्याची निवड होण्याची शक्यता नव्हती, परंतु धोनीने हार्दिकवर विश्वास दाखविला आणि त्याला संधी दिली.
महत्त्वाच्या बातम्या –
जीवनातील या ८ महत्त्वाच्या गोष्टी, ज्या धोनीकडून आहेत शिकण्यासारख्या
असे ५ गोलंदाज, ज्यांनी धोनीला करु दिल्या नाहीत शेवटच्या ओव्हरमध्ये धावा
आयपीएलमधील ‘हे’ ७ विक्रम आहेत केवळ एमएस धोनीच्याच नावावर