कोरोना व्हायरसने सामान्य लोकांसह स्टार खेळाडूंच्या जीवनावर कसा परिणाम केला आहे, याची उदाहरणं आता समोर येऊ लागली आहेत. संपूर्ण जगातील लॉकडाउनने अनेकांचे आयुष्य बदलले. बर्याच संस्था बंद पडल्या, सार्वजनिक कार्यक्रमही रद्द केले. व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आणि याचा परिणाम म्हणजे बर्याच लोकांनी नोकर्या गमावल्या. या व्हायरसमुळे नेदरलँड्सचा एक खेळाडूही वैयक्तिकरीत्या प्रभावित झाला. त्याचे नाव पॉल व्हॅन मीकेरेन आहे.
मोठी स्पर्धा करावी लागली रद्द
या साथीच्या रोगामुळे खेळाच्या बर्याच स्पर्धा रद्द कराव्या लागल्या. त्यापैकी आयपीएल, टी-20 विश्वचषक एक आहेत, जे पुढे ढकलण्यात आले आहेत. टी-20 विश्वचषकाचे आयोजन यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत होणार होते.
पहिल्या दहा संघांव्यतिरिक्त, स्कॉटलंड, आयर्लंड, पापुआ न्यू गिनी, ओमान, नामिबिया आणि नेदरलँड्स हे सहा संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. परंतु स्पर्धा लांबणीवर पडल्याने त्यांचे अनेक क्रिकेटपटू वैयक्तिकरित्याही प्रभावित झाले.
करावे लागले डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम
नेदरलँड्समधील गोलंदाज पॉल व्हॅन मीकेरेनला अलीकडेच आपल्या रोजच्या गरजा भागविण्यासाठी उबर ईट्समध्ये डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करावे लागले आहे. एका ट्विटर पोस्टवर या गोलंदाजाने हा खुलासा केला. नेडलँड्समध्ये जन्मलेल्या पॉलने 2013 मध्ये केनियाविरुद्ध टी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
एका महिन्यानंतर टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने वनडे सामन्यात पदार्पण केले. जिथे त्याने हाशिम आमलाला आपला बळी बनवले. पॉलने 5 वनडे आणि 41 टी-20 सामन्यांत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने वनडेत 4 आणि टी-20मध्ये 47 बळी आहेत. तो काउंटी क्रिकेटमध्ये समरसेटकडून खेळला आहे. तसेच तो त्याच्या राष्ट्रीय संघाच्या यशासाठी एक महत्त्वाचा खेळाडू आहे. नेदरलँड्स आता 2021 टी-20 विश्वचषकात खेळताना दिसणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ पठ्ठ्या भारताविरुद्ध कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार
‘असे’ ठरणार कसोटी चॅम्पियनशीपमधील अव्वल दोन संघ; भारतासाठी वाट कठीण
“विराट जागतिक क्रिकेटमधील सामर्थ्यवान खेळाडू”, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचे वक्तव्य
ट्रेंडिंग लेख-
‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर