लंडन| पाकिस्तानविरुद्धच्या तिसर्या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्यात डाव्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे इंग्लंडचा फलंदाज ओली पोप चार महिने क्रिकेटपासून दूर राहील.
तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान चौकार रोखण्यासाठी पोपने सोमवारी(२४ ऑगस्ट) वेगाने उडी घेतली. त्यामुळे त्याच्या खांद्याला मार बसला. खांदा दुखावल्यानंतर लगेचच 22 वर्षीय या खेळाडूने मैदान सोडले होते. आता पुढील काही आठवड्यांत त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल.
हा सामना अनिर्णित राहिला आणि इंग्लंडने ३ सामन्यांची कसोटी मालिका १-० ने जिंकली. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आशा आहे की 2021 च्या सुरुवातीला संघ श्रीलंका आणि भारत दौर्यावर येईल तेव्हा पोप योग्य वेळी इंग्लंडला परतेल.”
विंडीज आणि पाकिस्तानविरुद्धच्या अखेरच्या कसोटी मालिकेत पोपने चांगली कामगिरी केली होती. त्याला इंग्लंड क्रिकेटमधील एक चांगला भावी फलंदाज म्हणून पाहिले जात आहे. ओली पोपने इंग्लंडकडून 13 कसोटी सामन्यात 1 शतक आणि 5 अर्धशतकांद्वारे 37.94 च्या सरासरीने 645 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सीएसकेचे १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीची प्रतिक्रिया; म्हणतो,
-दुबई पोहोचल्यानंतर सीएसकेच्या खेळाडूंनी ही गोष्ट केल्याने झाली कोरोनाची लागण?
ट्रेंडिंग लेख-
-सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार
-आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई अडकलीय दुविधेत; पहा काय आहेत त्यामागील ३ कारणे
-तेराव्या हंगामानंतर ‘या’ २ भारतीय खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमधून नेहमीसाठी सुट्टी, वाचा