---Advertisement---

‘रोहित शर्मा पुढचा एमएस धोनी आहे’, पहा कोण म्हणतंय

On: बुधवार, जुलै 29, 2020 5:17 PM
---Advertisement---

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैनाने म्हटले आहे की रोहित शर्मा हा भारतीय क्रिकेट संघाचा पुढचा एमएस धोनी आहे. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने नेतृत्व करताना अनेक मोठे विक्रम केले आहेत. तो त्याच्या नेतृत्वकौशल्यामुळे भारतातच नाही तर जगात लोकप्रिय आहे. तसेच सध्या रोहित हा भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार आहे.

द सुपर ओव्हर पॉडकास्टशी बोलताना रैना म्हणाला, ‘मला वाटते की रोहित हा भारतीय क्रिकेट संघासाठी पुढचा एमएस धोनी आहे. मी रोहितला पाहिले आहे, तो शांत असतो, तो ऐकून घेतो. तो खेळाडूंमध्ये आत्मविश्वास भरतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो पुढे येऊन नेतृत्व करतो. जेव्हा कर्णधार पुढे येऊन नेतृत्व करतो आणि त्याचवेळेला जेव्हा तो ड्रेसिंगरुममधील वातावरणाचाही आदर करतो, तेव्हा तूमच्याकडे सर्वकाही असते.’

रैना पुढे म्हणाला, ‘रोहित सर्वजण कर्णधार आहेत, असेच समजतो. मी त्याला पाहिले आहे. आम्ही जेव्हा बांगलादेशमध्ये आशिया चषक जिंकला तेव्हा मी त्याच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे. मी त्याला शार्दुल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर आणि युझवेंद्र चहल सारख्या युवा खेळाडूंना आत्मविश्वास देताना पाहिले आहे.’

‘त्याच्या अवतीभवती असणारे खेळाडू त्याच्यातील उर्जेचा आनंद घेतात. जेव्हा तूम्ही एखाद्या खेळाडूच्या सहवासाचा आनंद घेता तेव्हा तूम्ही सकारात्मक राहता आणि मला वाटते त्यातच रोहित चांगला आहे.’

तसेच धोनी आणि रोहितबद्दल रैना पुढे म्हणाला, ‘एमएस धोनी हुशार आहे. रोहित धोनीपेक्षा अधिक आयपीएल ट्रॉफी जिंकला आहे, पण त्या दोघांमध्येही खूप साम्य आहे. कर्णधार म्हणून दोघांनाही ऐकून घ्यायला आवडते. जेव्हा तूमचा कर्णधार ऐकत असतो, तेव्हा तूम्ही बऱ्याच समस्या सोडवू शकता. त्यामुळे माझ्यासाठी ते दोघेही मस्त आहेत.’

रोहित आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. एवढेच नाही तर रोहितने काही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया चषक आणि निदाहास ट्रॉफीचे विजेतेपदही जिंकले आहे.

त्याचबरोबर रैना त्याच्या स्वत:च्या भविष्याबद्दल म्हणाला, ‘मला वाटते की मी अजून खेळू शकतो. पण त्याचवेळेला क्रिकेटचा आनंदही मला घ्यायचा असतो. मी माझ्या क्रिकेटचा मागील काही वर्षात आनंद घेतलेला नाही.’

रैना जुलै २०१८ पासून भारतीय संघातून दूर आहे. त्याने आत्तापर्यंत १८ कसोटी सामने, २२६ वनडे सामने आणि ७८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत २६.४८ च्या सरासरीने ७६८ धावा केल्या आहेत. तर वनडेत ३५.३१ च्या सरासरीने ५६१५ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी२० त्याने २९.१८ च्या सरासरीने १६०५ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

एक चुकी वेस्ट इंडिजला भोवली, तर अन्य ५ खास कारनामेही या कसोटीत पहायला मिळाले

५०० विकेट्स घेणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्तीबद्दल केले मोठे भाष्य, म्हणतो अजून काही…

…म्हणून धोनीने चालू सामन्यात विराटला बनवले यष्टीरक्षक; विराटचा खुलासा…

ट्रेंडिंग लेख –

आरसीबीने आयपीएलमध्ये केल्यात सर्वाधिकवेळा २०० पेक्षा अधिक धावा; पहा बाकी संघ आहेत कोणत्या क्रमांकावर

एमएस धोनीमुळे भारतीय संघाला मिळाले हे ५ ‘मॅच विनर’ खेळाडू

भारताविरुद्ध वनडेत सर्वाधिक शतक ठोकणारे ४ फलंदाज

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---