इंडियन प्रीमियर लीगच्या चेन्नई सुपर किंग्स संघाने रविवारी (२६ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध ८ विकेट्सने जबरदस्त विजय मिळवला. मात्र त्यानंतर रात्री झालेल्या दूसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला ८ विकेट्सने मात दिली. त्यामुळे अधिकृतपणे गणीती समीकरणांनुसार चेन्नई संघ यंदाच्या आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अशात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनीने संघाची पाठराखण केली आहे.
साक्षीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर अतिशय भावनिक कविता पोस्ट केली आहे. ‘हा खेळ तर आहे… यात तुम्ही कधी जिंकता, तर कधी हारता ..,’ अशी ती कविता आहे. चेन्नई सुपर किंग्सनेही त्यांच्या अधिकृत ट्विटर अकांउटरवर साक्षीची ती कविता शेअर करत लिहिले आहे की, ‘आमच्या राणीची कविताच सर्वकाही सांगून जाते.’
https://www.instagram.com/p/CGxkJVjHfig/?utm_source=ig_web_button_share_sheet
The Queen's scroll says it all. 🦁💛 #WhistlePodu #Yellove https://t.co/I27qKtfHxD
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 25, 2020
महत्त्वाचे म्हणजे, आयपीएलच्या १३ वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले की चेन्नई संघ खेळत असताना ते प्लेऑफमध्ये प्रवेश करणार नाहीत. या हंगामाच्या आधी चेन्नईने खेळलेल्या सर्व १० आयपीएल हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यातही ८ वेळा त्यांनी अंतिम सामना खेळला आहे. त्यातील ३ वेळा विजय मिळत त्यांनी आयपीएल चषकावर नाव कोरले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘२०२१ वर्ष आपलंच असेल!’, चेन्नईचे आव्हान संपल्याने ट्विटरवर आल्या भावनिक प्रतिक्रिया
आयपीएल २०२०: मुंबईविरुद्ध राजस्थानच्या विजायनंतर चेन्नईचे आव्हान संपुष्टात; पाहा अशी आहे गुणतालिका
आयपीएल २०२० च्या प्लेऑफचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ ठिकाणी रंगणार फायनलचा थरार
ट्रेंडिंग लेख-
IPL 2020: ‘या’ ३ संघांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, तर एका स्थानासाठी झगडणार ४ संघ
कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी
अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती