चेन्नई सुपर किंग्सचा उपकर्णधार व ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाने वैयक्तिक कारणास्तव आयपीएल २०२० मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल सारख्या स्पर्धेत एक संधी मिळावी म्हणून अनेक युवा खेळाडू देव पाण्यात ठेवून बसलेले असतात. मोसमाच्या मध्यात कोणी जखमी झाले तर लिलावावेळी यादीत नाव असलेल्या खेळाडूला त्या जखमी अथवा स्पर्धेतून बाहेर झालेल्या खेळाडूऐवजी संधी मिळते.
आज आम्ही तुम्हाला या लेखात त्या भारतीय खेळाडूंची नावे सांगणार आहोत, जे सुरेश रैनाऐवजी चेन्नई सुपर किंग्ज संघात निवडले जाऊ शकतात.
१) युसुफ पठाण
आयपीएलमधील सर्वोत्तम भारतीय अष्टपैलू राहिलेल्या युसूफ पठाणचा फॉर्म आयपीएल २०१९ मध्ये खूपच खराब होता.त्याने पूर्ण हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून १० सामने खेळताना १३ च्या मामुली सरासरीने अवघ्या ४० धावा केल्या होत्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेटही ८८.८८ होता.
युसूफ पठाणच्या या खराब कामगिरीनंतर सनरायझर्सने त्याला करारमुक्त केले. त्यानंतर झालेल्या आयपीएल लिलावात देखील कोणत्याच संघाने त्याच्यावर बोली लावली नाही. सुरेश रैनाचा बदली खेळाडू म्हणून अनुभवी युसूफ चेन्नईसाठी फायदेशीर ठरू शकतो.
२) रोहन कदम
देशांतर्गत क्रिकेटचे सलग दोन हंगाम गाजवणाऱ्या कर्नाटकच्या डावखुऱ्या रोहन कदम याला चेन्नई आपल्या संघात स्थान देऊ शकते. रोहनने २०१८ व २०१९ च्या विजय हजारे ट्रॉफी व सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत कर्नाटकच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
आयपीएल २०२० लिलावावेळी ३० लाख आधारभूत किंमत असतानाही रोहनला कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. सलामीवीर ते फिनिशर अशा सर्व भूमिकात एकदम चपखलपणे बसणारा रोहन आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो.
३) हनुमा विहारी
भारतीय कसोटी संघाचा सदस्य असलेल्या हनुमा विहारी याला २०१९ आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने दोन कोटी रुपयात खरेदी केले होते. मात्र, रकमेला अनुसरून, कामगिरी त्याला दाखवता आली नाही. विहारीला २ सामन्यात अवघ्या चार धावा करता आल्या होत्या.
त्यामुळे, दिल्ली कॅपिटल्सने त्याला आयपीएल २०२० च्या लिलावापूर्वी करारमुक्त केले. आयपीएल २०२० च्या लिलावात कोणत्याही फ्रेंचायझीने त्याला खरेदी करण्यात रस दाखविला नाही. मात्र, सुरेश रैना बाहेर पडल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज विहारीला संघात सामील करून घेण्यात स्वारस्य दाखवू शकते.
४) शाहरुख खान
तमिळनाडू प्रीमियर लीगचा हंगाम गाजवणारा शाहरुख खान चेन्नई सुपर किंग्सच्या रडारवर असेल. हा २३ वर्षीय फलंदाज आपल्या उत्तुंग षटकार मारण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध आहे. आक्रमक फलंदाजी सोबतच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणूनही तो प्रसिद्ध आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोईन अलीला बाद करण्यासाठी रिझवानने वापरली ही आयडीया; म्हणाला, त्याला उर्दू येते…
-दुबई पोहोचल्यानंतर सीएसकेच्या खेळाडूंनी ही गोष्ट केल्याने झाली कोरोनाची लागण?
ट्रेंडिंग लेख-
सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार
-आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई अडकलीय दुविधेत; पहा काय आहेत त्यामागील ३ कारणे
-टी२० क्रिकेटमधील ‘या’ शानदार विक्रमात विराट कोहलीने टाकलंय रोहित शर्माला मागे, घ्या जाणून