---Advertisement---

कसोटी, वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीयांची सरत्या वर्षात चमकदार कामगिरी, पाहा बीसीसीआयची खास यादी

On: शनिवार, डिसेंबर 31, 2022 7:54 PM
---Advertisement---

बीसीसीआयने 2022 मध्ये भारतीय क्रिकेट संघासाठी सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंची यादी घोषित केली आहे. क्रिकेटच्या तिन वेगवेगळ्या फॉरमॅट्ससाठी बीसीसीआयने प्रत्येकी वेगवेगळी यादी घोषित केली आहे. यादीत प्रत्येकी दोन खेळाडूंचा समावेश केला गेला आहे, ज्यांनी संघासाठी फलंदाजी आणि गोलंदाजी विभागात सरत्या वर्षात सर्वोत्तम योगदान दिले.

कसोटी फॉरमॅटमध्ये रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह सर्वोत्तम –
भारतीय कसोटी संघासाठी सरत्या वर्षात रिषभ पंत (Rishabh Pant) सर्वोत्तम फलंदाज राहिला. 25 वर्षीय पंतने 61.81 च्या सरासरीने 680 धावा केल्या आहेत. त्यांनी वर्षभरात दोन शतक आणि चार अर्धशतके केली आहेत. 146 धावा ही पंतची सर्वोत्तम खेळी ठरली. तसेच कसोटी गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पहिल्या क्रमांकावर राहिला. बुमराहने यावर्षी भारतासाठी पाच कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याने तब्बल 22 विकेट्स नावावर केल्या.

वनडे फॉरमॅटमध्ये मोहम्मद सिराज आणि श्रेयस अय्यर टॉपवर –
वनडे क्रिकेटमध्ये सरत्या वर्षात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने त्याची जादू दाखवली. त्याने 2022 मध्ये एकूण 17 वनडे सामने खेळले आणि यात 724 धावा केल्या. या धावा त्याने 55.69 च्या सरासरीने केल्या असून यात एक शतक आणि सहा अर्धशतकांचा देखील समावेश आहे. गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याने खास प्रदर्शन केले. सिराजने 15 सामन्यांमध्ये 24 विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 4.62 चा होता.

टी-20 फॉरमॅटमध्ये सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमार सर्वोत्तम
टी-20 फॉरमॅटचा विचार केला, तर यामध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) फलंदाजांच्या यादीत सर्वोत्तम राहिला. सूर्यकुमार 2022 मध्ये वादळी प्रदर्शन करत होता आणि त्या टी-20 रँकिंगमध्ये पहिला क्रमांक देखील पटकावला. सूर्याने वर्षभरात एकूण 31 सामने खेळले आणि यात 1164 धावा केल्या. या धावा करताना त्याची सरासरी 46.56 होती, जी या फॉरमॅटच्या मानाने खूपच चांगली आहे. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार (bhuvaneshwar kumar) पहिल्या क्रमांकावर होता. भुवनेश्वरने 32 सामन्यांमध्ये 37 विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 6.98 होता.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---