झिम्बाब्वे येथे सुरू असलेल्या वनडे विश्वचषक क्वालिफायर्स स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (9 जुलै) खेळला गेला सुपर सिक्स फेरीच्या अखेरीनंतर राहिलेल्या श्रीलंका व नेदरलँड्स यांच्या दरम्यान झालेल्या या अंतिम सामन्यात श्रीलंकेने 128 धावांनी दणदणीत विजय मिळवला. फिरकीपटू महिश तिक्षणा हा श्रीलंकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला. नेदरलँड्स संघ पराभूत झाला असला तरी यापूर्वी त्यांनी भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकासाठी आपली जागा पक्की केली आहे.
Sri Lanka take home the #CWC23 Qualifier title after a comfortable victory 🏆#SLvNED 📝: https://t.co/SUQRny5eih pic.twitter.com/9HytzsJy1M
— ICC (@ICC) July 9, 2023
हरारे येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात उतरण्याआधीच श्रीलंका व नेदरलँड्स हे संघ भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी पात्र ठरले होते. या सामनातून केवळ विजेता निवडण्याची औपचारिकता बाकी होती. नेदरलँड्सच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, त्यांचे दोन्ही सलामीवीर चांगली सुरुवात मिळाल्यानंतर ही मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत. कुसल मेंडिसने 43, असारिंगेने 57 तर, चरिथ असलंकाने 36 धावा केल्याने श्रीलंकेने 233 धावांपर्यंत मजल मारली. नेदरलँडच्या चार गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी घेत श्रीलंकेचा डाव रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या नेदरलँड्स संघाला श्रीलंकेच्या गोलंदाजीने स्थिरावू दिले नाही. वेगवान गोलंदाज मधुशंका याने तुफानी गोलंदाजी करताना अवघ्या 41 धावांवर नेदरलँडचा अर्धा संघ तंबूत पाठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर फिरकीपटू महिश तिक्षणा याने 4 व हसरंगाने 2 बळी घेताना नेदरलँड्सचा डाव 105 धावांवर संपुष्टात आणला. तीन बळी घेणाऱ्या मधुशंका याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
(2023 ODI World Cup Qualifiers Srilanka Beat Netherlands In Final)
महत्वाच्या बातम्या-
‘विराट FAB 4चा भाग नाही, बाबरचे नाव जोडा…’, माजी भारतीय क्रिकेटपटूचे खळबळजनक विधान
बेअरस्टोसोबत कन्फ्युजन, तरीही हवेत झेप घेत हॅरी ब्रूकने पकडला सुपरमॅन कॅच, तुम्ही पाहिला का?