---Advertisement---

१९९९मध्ये केले आंतरराष्ट्रीय पदार्पण, आजही ‘ते’ तिघे खेळताय देशासाठी क्रिकेट

On: मंगळवार, ऑगस्ट 11, 2020 8:01 PM
---Advertisement---

कोणत्याही खेळाडूसाठी आपल्या देशाच्या राष्ट्रीय संघात आपले स्थान टिकवून ठेवणे खूप कठीण असते. काही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करतात, पण काही सामने खेळल्यानंतर त्यांच्या खराब प्रदर्शनामुळे त्यांना संघातून बाहेर केले जाते. एवढेच नाही तर, बऱ्याचदा काही खेळाडूंना त्यांच्या चांगल्या प्रदर्शनानंतरही एखाद्या कारणामुळे संघातून बाहेर केले जाते.

आपल्या राष्ट्रीय संघासाठी सलग कित्येक वर्षे शानदार प्रदर्शन करणे, हे कोणत्याही क्रिकेटपटूसमोरील सर्वात मोठे आव्हान असते. आजवर बरेच असे महान क्रिकेटपटू होऊन गेले आहेत, ज्यांनी वर्षानुवर्षे आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. सचिनने १९८९ ते २०१३ म्हणजे तब्बल २४ वर्षे भारताकडून क्रिकेट खेळले आहे.

सचिनव्यतिरिक्त असेही काही क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी ९०च्या दशकात त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. पण, त्यांनी अजूनही क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. या लेखात, अशाच ३ क्रिकेटपटूंचा आढावा घेण्यात आला आहे, ज्यांनी ९०च्या दशकात त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. पण, अद्यापही हे क्रिकेटपटू निवृत्त झाले नाहीत.

९०च्या दशकात पदार्पण केलेले तीन क्रिकेटपटू, जे अजूनही झाले नाहीत निवृत्त (3 Cricketers Who Play Since 90 But Yet Not Retired)-

ख्रिस गेल- 

युनिव्हर्सल बॉस नावाने प्रसिद्ध ख्रिस गेल याने सप्टेंबर १९९९ला भारताविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. वेस्ट इंडिजच्या ४० वर्षीय विस्फोटक फलंदाज गेलने आतापर्यंत १०३ कसोटी, ३०० वनडे आणि ५८ टी२० सामने खेळले आहेत. डावखुऱ्या फलंदाज गेलने आतापर्यंत अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

गेल हा सर डॉन ब्रॅडमन, ब्रायन लारा आणि विरेंद्र सेहवागनंतर कसोटीत २ त्रिशतके करणारा चौथा फलंदाज आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करणारा तो पहिला फलंदाज आहे. ऑगस्ट २०१९मधील भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यानंतर गेल क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा करेल, असे सर्वांना वाटले होते. परंतु, गेलने हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले.

गेलने ९०च्या दशकात त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. पण, तो अजूनही क्रिकेटविश्वातील ऍक्टिव्ह क्रिकेटपटू आहे.

शोएब मलिक-

पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज शोएब मलिकने जवळपास २ दशके पाकिस्तान संघाकडून क्रिकेट खेळले आहे. १९९९ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्यातून शोएबने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने पाकिस्तानकडून ३५ कसोटी, २८७ वनडे आणि ११३ टी२० सामने खेळले आहेत.

२००१ला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शोएबने २००६ साली श्रीलंकाविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याच्या कारिकिर्दीतील अविस्मरणीय खेळी केली होती. त्या सामन्यात शोएबने पाकिस्तानकडून पूर्ण दिवस फलंदाजी करत ३६९ चेंडूत नाबाद १४८ धावा केल्या होत्या. पण, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपले पूर्ण लक्ष क्रेंदित करण्यासाठी शोएबने २०१५मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

तर, जुलै २०१९मध्ये विश्वचषकातील पाकिस्तान संघाचा शेवटचा सामना खेळल्यानंतर शोएबने ५० षटकांच्या वनडे क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. असे असले तरी, शोएब पाकिस्तान टी२० क्रिकेट संघाचा भाग आहे. तसेच, २८ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध खेळण्यात येणाऱ्या टी२० मालिकेसाठी शोएबची पाकिस्तान संघात निवड झाली आहे.

हरभजन सिंग-

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग गेल्या चार वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसला नाही. मार्च १९९८ला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून हरभजनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. त्यानंतर हरभजनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०३ कसोटी, २३६ वनडे आणि २८ टी२० सामने खेळले आहेत.

पण, या गोलंदाजाला एमएस धोनी भारतीय संघाचा कर्णधार असतानापासूनच संधी मिळणे कमी झाले होते. भारतीय संघात त्याची जागा आर अश्विनने घेतली होती. हरभजनला त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळून जवळपास ४ वर्षे झाली आहेत. त्याने मार्च २०१६ला युनायटेड अरब इमिरेट्सविरुद्ध शेवटचा टी२० सामना खेळला होता. सध्याच्या भारतीय संघाविषयी पाहायचे झाले, तर संघात एकापेक्षा एक फिरकीपटू उपलब्ध आहेत. त्यामुळे हरभजनला कदाचितच भारतीय संघात पुनरागमन करायला मिळेल. असे असतानाही हरभजनने अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही.

ट्रेंडिंग लेख –

-बीसीसीआयच्या दबावामुळे ‘हे’ ५ भारतीय क्रिकेटर लवकरच करणार क्रिकेटला टाटा बाय बाय

-आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळाडूंकडून होऊ शकतात हे ५ बहुचर्चित विक्रम

-आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या ५ फलंदाजांमध्ये पहिल्या दोन स्थानावर आहेत परदेशी क्रिकेटर

महत्त्वाच्या बातम्या –

-सनरायझर्स हैद्राबादच्या स्टार विकेटकिपरची बायको चालवते रेस्‍टॉरेंट, पतीबरोबर जाते विविध देशांच्या दौऱ्यावर

-हैराण करणारा विक्रम! आयपीएलमध्ये ४८ चेंडू खेळून एकही चौकार मारु न शकलेले क्रिकेटर

-पाकिस्तानबरोबर खराब प्रदर्शनामुळे जेम्स अँडसरनचं करियर संपलं? पहा काय म्हणतोय स्वत: अँडसरन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---