---Advertisement---

बॅक टू पॅव्हेलियन! चेन्नई सुपर किंग्स या ३ जुन्या खेळांडूंना पुन्हा करू शकतात संघात सामील

csk
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आयपीएल (IPL) इतिहासातील यशस्वी ठरलेल्या संघांपैकी एक संघ आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स संघाने ४ वेळा विजेतेपद पटकावले आणि ९ वेळा अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्याचा विक्रम केला आहे. या संघात आपण नेहमीच उत्कृष्ट खेळाडू बघितले आणि हा संघ अनुभवी खेळाडूंवर विश्वास ठेवतो हे आपल्याला माहितीच आहे.

आयपीएल २०२२ मेगा लिलावाआधी चेन्नई सुपर किंग्स संघाने अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) पहिला खेळाडू म्हणून रिटेन केलं. त्यानंतर कर्णधार महेंद्र सिंग धोनी(Mahendra Singh Dhoni), इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली (Moeen Ali) आणि आयपीएल २०२१ चा ऑरेंज कॅप विजेता ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांना संघात रिटेन केलं.

आता मेगा लिलावात या संघातून आधी खेळलेले खेळाडूसुद्धा असणार, त्यामुळे संघ यांना परत घेण्याचा प्रयत्न करू शकतात. या तर आज जाणून घेऊया असे ३ खेळाडू, जे ५ वर्षांनंतर पुन्हा संघात सामील होऊ शकतात

३ खेळाडू जे आयपीएल २०२२ मध्ये ५ वर्षांनंतर चेन्नई संघात परत येऊ शकतात

३. जेसन होल्डर (Jason Holder)
जेसन होल्डरने आयपीएल २०२१ मध्ये सनरायझर्स हैदराबाद (Sunrisera Hyderabad) कडून खेळताना उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्याने खेळलेल्या ८ सामन्यात १६ विकेट्स घेतल्या. फलंदाजीमध्ये सुध्दा त्याचा स्ट्राईक रेट १२० होता. साल २०१३ मध्ये होल्डरने आयपीएलमध्ये पदार्पण सीएसकेकडून खेळतानाच केले. हा संघ नेहमी अष्टपैलू खेळाडू घेण्यास पसंती देतो. त्यामुळे ड्वेन ब्रावोच्या जागी संघ होल्डरला परत घेऊ शकतो.

२. विजय शंकर (Vijay Shankar)
विजय शंकरने आपलं आयपीएल पदार्पण २०१४ मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना केलं होतं. हे खूप कमी लोकांना माहित असेल. तेव्हा तो फक्त एक सामना खेळला आणि त्यात त्याने एक षटक टाकून १९ धावा दिल्या होत्या. २०२१ मध्ये विजय शंकर सनरायझर्स हैदराबादकडून खेळत होता.

सध्या त्याने तामिळनाडू (Tamilnadu Cricket Team) कडून खेळताना उत्कृष्ट प्रदर्शन केलं आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) त्याच्या नेतृत्वात तामिळनाडू संघाला विजेतेपद मिळवून दिले. तामिळनाडूने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी तिसऱ्यांदा जिंकली. त्याच्यावर चेन्नई संघ पुन्हा विश्वास टाकू शकतात.

१. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)
भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारात उत्कृष्ट कामगिरी बजावत असतो. त्याने आयपीएल कारकिर्दीची सुरुवात २००९ मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना केली. २०१५ पर्यंत तो संघाचा भाग होता. त्यादरम्यान त्याने ९७ सामने खेळून ६.४६ च्या इकॉनॉमीने ९० विकेट्स घेतल्या.

अश्र्विनने टी२० विश्वचषकातून भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात प्रवेश केला आणि त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. चेन्नईच्या संघात मुख्य ऑफ स्पिनरची कमतरता आहे आणि अश्विन यासाठी चांगला पर्याय आहे. त्यामुळे सीएसके त्याला परत संघात घेण्याचा विचार करू शकते.

महत्त्वाच्या बातम्या – 

दक्षिण आफ्रिका क्रिकेटला गालबोट, डिविलियर्स, स्मिथसारख्या दिग्गज खेळाडूंवर गंभीर आरोप

रोहित ते अक्षर, २०२१ वर्षांत भारतीय संघाकडून रचण्यात आले ‘हे’ ५ विक्रम

दुसऱ्या ऍशेस कसोटीत वॉर्नर, स्टोक्स, अँडरसन रचू शकतात इतिहास, ‘या’ मोठ्या विक्रमांची होणार नोंद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---