आयपीएलचे १२ हंगाम यशस्वीरीत्या पार पाडले आहेत. आता आता १३ वा हंगामही सुरु होईल. आयपीएलचे चषक अनेक संघांनी जिंकले. परंतु असेही काही संघ आहेत ज्यांना एकदादेखील आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याची संधी मिळाली नाही. यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या नावाचाही समावेश आहे. आयपीएलमध्ये असे तीन संघ आहेत जे नियमित खेळूनही एकदाही स्पर्धा जिंकू शकले नाहीत. संघात दिग्गज खेळाडू असूनही जेतेपद जिंकू न शकणे याला दुर्दैवी म्हणता येईल.
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने कित्येक प्रसंगी प्रभावी कामगिरी केली. परंतु चांगला खेळ करूनही बर्याच वेळा या संघाला प्लेऑफमध्येही पोहोचण्याची संधी मिळाली नाही. काही प्रसंगी या संघाला पहिल्या चारमध्ये बाहेर जावे लागले. युवराज सिंग, ख्रिस गेल आणि वीरेंद्र सेहवागसारख्या दिग्गजांनी या संघासाठी चांगली कामगिरी केली. यात किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी असे बरेच खेळाडू आहेत ज्यांनी चांगले प्रदर्शन केले आहेत आणि काही असेही खेळाडू आहेत जे या संघासाठी आयपीएलमध्ये खेळताना अपयशी ठरले आहेत.
किंग्ज इलेव्हन पंजाब संघातील अपयशी ठरलेले ३ खेळाडू-
जेम्स फॉकनर (James Faulkner)
२०१२ च्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघात या ऑस्ट्रेलियन खेळाडूला सामील करून घेण्यात आले होते. यावेळी फॉकनरने ४ सामन्यांत ३ गडी बाद केले. त्याने भरपूर धाव दिल्या आणि फलंदाजीमध्ये त्याला काही खास काम करता आले नाही. यानंतर संघाने त्याला सोडले आणि तो राजस्थान रॉयल्सकडून खेळू लागला.
थिसारा परेरा (Thisara Pereira)
हा खेळाडू आयपीएलमध्ये अनेक संघांकडून खेळला आहे. २०१४ आणि २०१५ मध्ये त्याने २ सामने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळले. फलंदाजीमध्ये १२ धावा करणाऱ्या परेराने गोलंदाजीत मात्र एक गडी बाद केला. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघात परेराला पुन्हा संधी देण्यात आली नाही. सनरायझर्स हैद्राबादकडून त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे.
ऍरॉन फिंच (Aaron Finch)
या खेळाडूने आयपीएलमध्ये अनेक वेगवेगळ्या संघातून आपला खेळ दाखवला आहे. त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून १० सामन्यांत केवळ १३४ धावा केल्या आहेत. अशा कामगिरीनंतर त्याला संघातून वगळण्यात आले. ऍरॉन फिंच सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आहे. यावेळी त्याचा खेळ पाहण्यासारखा असेल.
ट्रेंडिंग लेख-
-आजोबा, मुलगा व नातू अशा तीन पिढ्या क्रिकेट खेळलेल्या घरातील नातवाची गोष्ट
-आयपीएल २०२०मधून माघार घेतलेल्या मलिंगाने केलाय ‘हा’ मोठा विक्रम, सीएसकेच्या एका खेळाडूचाही समावेश
-तिशीतच आयर्लंडचा दिग्गज झालेला पॉल स्टर्लिंग
महत्त्वाच्या बातम्या-
-सौरव गांगुलीला कठिण काळात प्रणव मुखर्जींनी दिले होते समर्थन; म्हणाले होते…
-किंग्स इलेव्हन पंजाबचा धुरंदर म्हणतोय, आयपीएलमध्ये न खेळण्यापेक्षा नियमांचे पालन करणे बरे
-१२.५कोटी रुपयांना संघात विकत घेतलेल्या खेळाडूविषयी वाटतेय राजस्थान रॉयल्सला चिंता, कारण घ्या जाणून