आजपासून (१२ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. हे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. तत्पूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा डाव्या हाताचा जलद गोलंदाज टी नटराजन दुखापतग्रस्त झाला आहे. अशात इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत त्याची पूर्ण कमी करण्यासाठी नव्या गोलंदाजाला संधी दिली जाऊ शकते. त्याच गोलंदाजांचा आम्ही येथे आढावा घेतला आहे.
नटराजनची जागा घेऊ शकणारे तीन भारतीय गोलंदाज
१) ईशान पोरेल : सय्यद मुस्ताक अली टी-२० स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या, २२ वर्षीय ईशान पोरेलने २०१९ मध्ये बंगाल संघासाठी पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकूण, १९ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने १५.८२ च्या सरासरीने २९ गडी बाद केले आहेत. सय्यद मुस्ताक अली टी-२० स्पर्धेतील कामगिरी पाहता भारतीय संघ व्यवस्थापन ईशानला नटराजनच्या जागी आपल्या संघात सहभागी करू पाहतील.
२) कार्तिक त्यागी: आयपीएल २०२० च्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळलेला, २० वर्षीय कार्तिक त्यागी देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याने देशांतर्गत स्तरावर १० टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने ९ फलंदाजांना माघारी धाडले आहे. याव्यतिरिक्त त्याने प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. याच्या जोरावर त्याला नटराजनच्या जागी संधी देण्यात येऊ शकते
३) लूकमान मेरीवाला : बडोदा संघासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा लुकमान मेरीवाला, कार्तिक आणि ईशानपेक्षा जास्त अनुभवी आहे. त्याने आपल्या ७ वर्षाच्या कारकिर्दीत एकूण ४४ टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने १४.५४ च्या सरासरीने तब्बल ७२ गडी बाद केले आहेत. यात त्याने ३ वेळेस ५ गडी बाद करण्याचा विक्रम देखील केला आहे. त्यामुळे भारतीय टी-२० संघात नटराजनचा विकल्प म्हणून मेरीवाला प्रबळ दावेदार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘थाला’चा मोठा डावपेच, आयपीएल २०२१ पुर्वी ‘नव्या मलिंगा’ला संधी; गोलंदाजी पाहून चक्रावून जाल
जेसन होल्डरची नेतृत्त्वपदावरुन कायमची सुट्टी, ‘हा’ खेळाडू विंडीज कसोटी संघाचा नवा कर्णधार
ऐतिहासिक द्विशतक! अफगाणिस्तानच्या ‘या’ क्रिकेटरने सुवर्णाक्षरांनी इतिहासात नोंदवले नाव