सर्वाधिक वेगवान 200 कसोटी बळी घेणारे 3 भारतीय: जसप्रीत बुमराहची तीक्ष्ण गोलंदाजी मेलबर्नमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा दिसून आली. बुमराहने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव हादरवून सोडला आणि यादरम्यान त्याने कसोटी क्रिकेटमधील 200 बळीही पूर्ण केले. कसोटीत 200 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा तो केवळ 12वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. चला जाणून घेऊया कसोटीत सर्वात जलद 200 विकेट घेणारे तीन भारतीय गोलंदाज कोण आहेत.
3 रवींद्र जडेजा (44 कसोटी)
डावखुरा फिरकी अष्टपैलू रवींद्र जडेजाने आपल्या 44व्या कसोटी सामन्यात कसोटी क्रिकेटमधील 200 बळी पूर्ण केले. ऑक्टोबर 2019 मध्ये विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्याने ही कामगिरी केली. जडेजाने आता आपल्या कसोटी कारकिर्दीत 300 हून अधिक बळी घेतले आहेत आणि तो भारताच्या सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे.
2 जसप्रीत बुमराह (44 कसोटी)
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 44 व्या कसोटीत कसोटी क्रिकेटमध्ये 200 बळी पूर्ण केले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत बुमराहने ही कामगिरी केली. 200 पेक्षा जास्त विकेट घेतल्यामुळे बुमराहची सरासरी 20 पेक्षा कमी आहे. जी प्रशंसनीय आहे. तसेच तो सर्वात वेगवान 200 कसोटी बळी घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत त्याने 12 वेळा कसोटी डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत.
1 रविचंद्रन अश्विन (37 कसोटी)
भारतासाठी सर्वात जलद 200 कसोटी बळी घेण्याचा विक्रम अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या नावावर आहे. ज्याने नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. अश्विनने सप्टेंबर 2016 मध्ये कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 200 कसोटी बळी पूर्ण केले. त्याने केवळ 37 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. भारतासाठी 200 कसोटी बळी घेणारा तो सर्वात वेगवान गोलंदाज तसेच जगातील 200 कसोटी बळी घेणारा तिसरा वेगवान गोलंदाज आहे. अश्विनने 500 हून अधिक कसोटी विकेट्स घेऊन आपली कारकीर्द पूर्ण केली आणि तो कसोटीतील सर्वात यशस्वी भारतीय ऑफस्पिनर होता.
हेही वाचा-
जसप्रीत बुमराहचा कहर, 51 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाची मधली फळी 16 धावांत गडगडली
नक्की कॅप्टन आहे कोण? विराट की रोहित? पाहा व्हिडीओ काय म्हणतोय!
“जस्सी जैसा कोई नहीं..”, जसप्रीतची ‘बुम-बुम’ कामगिरी, मेलबर्न कसोटीत रचला इतिहास