फार पुर्वीपासूनच भारतीय खेळाडूंनी जगभरातील चाहत्यांची मने जिंकण्याचे काम केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात कोणत्या ना कोणत्या भारतीय खेळाडूने जगभरातील खेळाडूंच्या गर्दीमध्येही आपली छाप पाडली आहे. याची कारणे म्हणजे, त्यांची खेळण्याची अनोखी पद्धती, उत्कृष्ट कामगिरी, त्यांच्या स्वभाव, खेळाची समज असावी. शिवाय भारतीय संघाने जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबर त्यांच्या मनातील क्रिकेटचा आदर कायम ठेवण्याचे काम केले आहे.
कदाचित याच वैशिष्ट्यांमुळे फक्त चाहतेच नव्हे तर अनेक परदेशी खेळाडूही भारतीय क्रिकेटपटूंची एक झलक पाहण्यासाठी आतुरलेले असतात. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका अशा अनेक देशांत भारतीय क्रिकेटपटूंचे चाहते दिसून येतात.
या लेखात ३ दिग्गज भारतीय खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे, ज्यांचे चाहते जगभर दिसून येतात. 3 Indian Legends Are Most Popular All Over The World –
एमएस धोनी –
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला जगभरात मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शवली जाते. आपला शांत स्वभाव, उत्तम यष्टीरक्षण, उल्लेखनीय नेतृत्व आणि दमदार फलंदाजीने धोनीने क्रिकेट क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच, त्याच्या हेलिकॉप्टर शॉटमुळेही तो चाहत्यांच्या हृदयावर राज करतो. म्हणूनच कदाचित फक्त भारतात नव्हे तर जगभरात धोनीने चाहते दिसून येतात. अनेकदा भारतीय संघ परदेश दौऱ्यावर गेला असताना धोनीच्या नावाचे पोस्टर किंवा बॅनर घेऊन चाहते स्टेडियममध्ये दिसून येतात.
राहुल द्रविड –
भारतीय क्रिकेटची भिंत म्हणजेच ‘द वॉल’ नावाने प्रसिद्ध असणारा दिग्गज फलंदाज म्हणजे राहुल द्रविड होय. कसोटी क्रिकेटमधील दमदार प्रदर्शनासह वनडेतही द्रविडने प्रशंसनीय खेळी केली होती. हेच कारण आहे की, क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन कित्येक वर्षे लोटल्यानंतरही द्रविडची आठवण काढली जाते. जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून द्रविडला भरभरुन प्रेम मिळाले आहे.
सचिन तेंडुलकर –
क्रिकेट क्षेत्रातील प्रत्येक विक्रमात आपल्या नावाची नोंद करणारा क्रिकेटपटू म्हणजे सचिन तेंडुलकर. आपल्या धुरंधर फलंदाजी प्रदर्शनानेे सचिनने चाहत्यांची मने जिंकली. क्रिकेटमधील निवृत्तीनंतरही सचिनच्या खेळीला आणि त्याच्या साधेपणाला आठवले जाते. काही महिन्यांपुर्वी ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या बुशफायर रिलीफ सामन्यामध्ये सचिनसाठी दर्शकांमध्ये असलेला उत्साह पाहायला मिळाला. कसोटी आणि वनडे क्रिकेटमधील महान फलंदाज सचिनने आपल्या कारकिर्दीत अशी कामगिरी केली की, चाहत्यांनी त्याला क्रिकेटमधील देवाचा दर्जा दिला.
ट्रेंडिंग लेख-
कसोटी सामन्याच्या एका डावात ३५० पेक्षा जास्त धावा करणारे ५ फलंदाज
आख्ख्या कसोटी करियरमध्ये एकही षटकार फलंदाजाला मारु न देणारे…
युएईत होणाऱ्या आयपीएल २०२० मध्ये हे ४ संघ करु शकतात…
महत्वाच्या बातम्या –
मार्चनंतर पहिल्यांदाच चाहत्यांना मिळाली स्टेडिअममध्ये…
…म्हणून वेगवान गोलंदाजी करणारा युवराज सिंग बनला…
बांगलादेशच्या या युवा गोलंदाजावर दोन वर्षांची बंदी, जाणून…