नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर १० गडी राखून मोठा विजय मिळवला आहे. या विजयानंतर भारतीय संघ मालिकेत २-१ ने पुढे आहे. सामन्यापूर्वी, इंग्लंड संघ भारतीय संघावर भारी पडेल असे म्हटले जात होते. कारण खेळपट्टीवर गवत दिसून येत होते. याचाच फायदा घेत इंग्लंडचे खेळाडू सांघिक कामगिरी करत भारताला चितपट करण्याची शक्यता वर्तवली जात होती.
परंतु भारतीय फिरकी गोलंदाजांनी योग्य लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. दुसरीकडे इंग्लंडचा अपेक्षेप्रमाणे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीतही साजेशी कामगिरी करता आली नाही. येथे आम्ही इंग्लंडच्या पराभवामागील कारणे असू शकतील याचा आढावा घेतला आहे. चला तर पाहूया…
इंग्लंड संघाच्या पराभवाची तीन प्रमुख कारणे
पहिल्या डावात इंग्लंडच्या खेळाडूंची चुकीची फलंदाजी टेकनिक
इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय इंग्लंड संघाच्या दिशेने जातो की काय? असे वाटत असतानाच भारतीय गोलंदाजांनी कसून गोलंदाजी करत इंग्लंड संघाच्या फलंदाजांना बाद करायला सुरुवात केली. इंग्लंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांच्या सरळ चेंडूसाठी फिरकीप्रमाणे शॉट खेळत होते. याचमुळे भारतीय गोलंदाज सहजरित्या त्यांना बाद करत होते. जर इंग्लंडच्या फलंदाजांनी योग्य टेकनिकचा वापर करत फलंदाजी केली असती, तर त्यांना मोठी आकडी धावसंख्या करता आली असती.
अक्षर आणि आश्विनची उत्कृष्ट कामगिरी
भारतीय संघासाठी दुसरा कसोटी सामना खेळत असलेल्या अक्षर पटेलने दोन्ही सामन्यात आपल्या फिरकी गोलंदाजीने संघाला विजय मिळवून दिला. यात अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनने त्याला पूरेपूर साथ दिली. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना अक्षरची गोलंदाजी खेळताना अडचणींचा सामना करावा लागत होता. कुठला चेंडूत सरळ येईल आणि कुठला फिरेल हे कळतच नव्हते. त्यामुळे अक्षरने दोन दिवसात संपलेल्या या सामन्यात तब्बल ११ गडी बाद केले. तसेच आर अश्विन आणि अक्षर पटेल या जोडीने एकूण १८ गडी बाद केले.
इंग्लंडची दुसऱ्या डावात निराशाजनक कामगिरी
इंग्लंडच्या फलंदाजांनी पहिल्या डावात केलेली चूक दुसऱ्या डावातही केली. त्यांना कुठला चेंडू सरळ येत आहे आणि कुठला स्पिन चेंडू हे कळतच नव्हते. त्यांना दुसऱ्या डावात आक्रमक खेळ करून धावा करता आल्या असत्या ,परंतु इंग्लंडचे फलंदाज रक्षात्मक फलंदाजी करताना बाद झाले. इंग्लंडने दिलेल्या ४९ धावांच्या आव्हानाला रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्या जोडीने सहजरीत्या पूर्ण केले आणि भारतीय संघाला १० गडी राखून विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
ए बापू तारी बोलिंग कमाल छे..! विराट कोहलीची गुजराती ऐकून तुम्हीही खदखदून हसालं, पाहा व्हिडिओ
डे-नाईट कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय, ‘या’ खेळाडूंना दिले कर्णधार कोहलीने विजयाचे पूर्ण श्रेय
INDvsENG: ‘अशा भज्जी-कुंबळेने ८००-१००० विकेट्स घेतल्या असत्या,’ माजी भारतीय अष्टपैलूचे टीकास्त्र