क्रिकेट इतिहासात पाकिस्तान क्रिकेटचा कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच वादात काहीतरी संबंध राहिलाय. पाकिस्तान क्रिकेट संघाचे विश्व क्रिकेटमध्ये खूपच महत्वपूर्ण नाव राहिलं आहे. पंरतु येथून खेळाडूंसोबतच पंचाचे नाव सुद्धा वादग्रस्त घटनामध्ये अनेकदा चर्चेत राहीले. पाकिस्तानचे कित्येक पंच आपल्या निर्णय आणि हरकतीच्या कारणामुळे वादात राहीले आहेत.
या लेखाच्या माध्यमातून अशा तीन पंचाबद्दल सांगणार आहोत, ज्यांना क्रिकेटच्या इतिहासात वादग्रस्त पंच या नावाने ओळखले जाते. त्याचबरोबर या तीन पंचाचे दुसर्या कोणाशी नाही पाकिस्तान क्रिकेटशी संबंध आहेत.
शकूर राणा
पाकिस्तानचे माजी क्रिकेटर पंच शकूर राणाला क्रिकेट इतिहासात सर्वात वादग्रस्त पंच म्हणून ओळखले जाते. शकूर राणा याने आपल्या पंच कारकिर्दीमध्ये कित्येकदा वादग्रस्त निर्णय दिले आहेत. या कारणामुळे त्यांची प्रतिमा एक खराब पंच ओळखली जाते.
सन १९८७ मध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यातील झालेला वाद हा त्याच्या कारकिर्दीतील मोठा वाद मानला जातो. फैसलाबादमध्ये खेळल्या गेलेल्या एका सामन्यात शकूर राणा याने खूपच खराब पंचगिरी केली.
या दरम्यान एका गोष्टीवरून इंग्लंडचा कर्णधार माइक गैटिंग आणि शकूर राणा यांच्यामधे मैदानात जबरदस्त वाद झाला. ज्यामधे शकूर राणा याला माइक गैटिंग याने बोट दाखवत धमकी दिली. या घटनेला क्रिकेट इतिहासात पंचासोबत झालेला सर्वात मोठा वाद मानला गेला.
इदरिस बैग
या यादीत पाकिस्तान क्रिकेटमधील अजून एका पंचाचे नाव आहे ते म्हणजे इदरिस बैग. पाकिस्तानचे माजी पंच बैग आपल्या वादग्रस्त निर्णयामुळे प्रसिद्ध आहेत. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी कित्येक मोठ्या सामन्यात पंच म्हणून भूमिका निभावली. पंरतु, ते प्रत्येकवेळी कोणत्या ना कोणत्या सामन्यात वादात अडकले गेले.
तसेच त्यांनी एका सामन्यात खराब निर्णयामुळे क्रिकेटच्या प्रतिमेचे उल्लंघन केले. ज्यामध्ये त्यांनी मेलबर्न क्रिकेट क्लब आणि पाकिस्तान यांच्यात पेशावर येथे खेळल्या गेल्या सामन्यादरम्यान बरेच चुकीचे निर्णय दिले. ज्याच्यानंतर त्यांना वादात अडकण्यापासून कोणीही थांबवू शकले नाही.
असद राउफ
पाकिस्तानचे अजून एक सर्वात प्रसिद्ध पंच म्हणून असद राउफ नाव राहीले आहे. असद राउफला क्रिकेट जगातील सर्वात चांगला पंच म्हणून ओळखलं जात होते. ज्याला सन 2012 मध्ये ‘अंपायर ऑफ द ईयर’ या सन्मानाने गौरविण्यात आले होते. परंतु पंच म्हणून नाही, तर मैदानाबाहेर आपल्या कारनाम्याने वादात अडकला. असद राउफवर यौन शोषणाचा आरोप लावण्यात आला. ज्यामुळे त्याच्या उत्कृष्ट पंच या प्रतिमेवर एक खूप मोठा डाग लागला.
एक मॉडेल लीना कपूर हिने असद राउफ याच्यावर मोठा गंभीर आरोप केला होता की, लग्न करतो म्हणून फसवून यौन शोषण केले. त्यानंतर पंच असद राउफ याने हे सर्व आरोप फेटाळले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
भारीच! विराट कोहली बनू शकतो ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा इतिहासातील पहिला खेळाडू
काय सांगता ! आपला झहीर खान होणार आमदार ?
भारतात क्रिकेटला पुन्हा सुरुवात! पहिल्याच सामन्याच मनोज तिवारी चमकला
ट्रेंडिंग लेख –
ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत विराटची उणीव भरून काढू शकतील असे ५ क्रिकेटर्स
जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव वॉलाही ‘त्यादिवशी’ दादाने टॉससाठी पहायला लावली होती वाट
१९ वर्षीय पार्थिव पटेल थेट ऑस्ट्रेलियात स्टीव्ह वॉला नडला पण…