मुंबई इंडियन्स हा संघ प्रत्येक आयपीएल हंगामात वेगळ्या रुपात पाहायला मिळतो. मुंबई इंडियन्समध्ये आतापर्यंत कधीही स्टार खेळाडूंची कमी राहिली नाही. कदाचित याच कारणामुळे मुंबईने आतापर्यंत ४वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली बऱ्याचदा मुंबई इंडियन्सने सुरुवातीच्या काही सामन्यांत पराभवाचा सामना केल्यानंतरही प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे.
सहसा कोणत्याही संघात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाच प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाते. त्यामुळे आयपीएलमध्ये टक्करीचे सामने पाहायला मिळतात. आतापर्यंत मुंबई इंडियन्सने दोनवेळा अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आहे. यामध्ये संघातील शानदार प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंचे महत्त्वाचे योगदान असते.
तसं तर, प्रत्येक खेळाडू क्रिकेट खेळताना आपले उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करतो. पण, कधी-कधी त्याच्या खराब फॉर्ममुळे किंवा इतर काही कारणांमुळे त्याला संघातून बाहेर करण्यात येते. किंवा काही खेळाडू संघाचा भाग असतात, पण त्यांना पूर्ण हंगामात एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळत नाही. मुंबई इंडियन्स संघातील तीन शानदार खेळाडूंनाही कदाचित आयपीएलच्या तेराव्या हंगामात एकाही सामना खेळण्याची संधी मिळू शकत नाही. चला तर बघूयात, कोण असतील ते तीन खेळाडू…
मुंबई इंडियन्सचे तीन खेळाडू ज्यांना यंदा एकाही सामन्यात मिळणार नाही संधी (3 Players Of Mumbai Indians Might Not Play Single Match This IPL) –
शेरफेन रुदरफोर्ड (Sharefane Rutherford) –
मुंबई इंडियन्स संघाकडून खेळण्याआधी वेस्ट इंडिजचा फलंदाज शेरफेन रुदरफोर्ड हा दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला होता. त्याने २० एप्रिल २०१९ ला किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पूर्ण हंगामातील त्याचे प्रदर्शन जास्त विशेष राहिले नाही. त्याने पूर्ण हंगामात ७ सामने खेळत केवळ ७३ धावा केल्या होत्या. यात त्याच्या सर्वाधिक नाबाद २८ धावांचा समावेश होता.
रुदरफोर्ड अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन न करु शकल्यामुळे यंदाच्या आयपीएल लिलावात त्याला दिल्लीने ट्रेड करत संघातून बाहेर केले. या अष्टपैलू खेळाडूला यंदा मुंबई इंडियन्सने आपल्या संघात सामाविष्ट केले आहे. परंतु, त्याला पूर्ण हंगामात एकादश संघात सहभागी होण्याची संधी मिळू शकत नाही. कारण सध्या मुंबई इंडियन्समध्ये कायरन पोलार्ड आणि हार्दिक पंड्या हे अष्टपैलू क्रिकेटपटू उपलब्ध आहेत.
नाथन कूल्टर नाइल (Nathan Coulter-Nile) –
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नाथन कूल्टर नाइलची आयपीएल कारकिर्द चांगली राहिली आहे. तो आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स या वेगवेगळ्या संघांचा भाग राहिला आहे. त्याने आयपीएलमध्ये २६ सामन्यात अष्टपैलू प्रदर्शन करत ५२ धावा आणि ३६ विकेट्स घेतल्या आहेत.
नाथनला आयपीएलमध्ये सलग जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे त्याच्या या आकडेवारीला वाईट म्हणता येणार नाही. आयपीएल २०२०मध्ये तो मुंबई इंडियन्सचा भाग आहे. पण संघात पुर्वीपासूनच लसिथ मलिंगा आणि ट्रेंट बोल्ट हे शानदार परदेशी खेळाडू उपलब्ध आहेत. म्हणून कदाचित त्याला या हंगामात एकही सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकत नाही.
मिचेल मॅकलेनघन (Mitchell McClenaghan) –
यापुर्वी मुंबई इंडियन्सचा नियमित खेळाडू असणाऱ्या मिचेल मॅकलेघनला नंतर जास्त सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. गतवर्षी मुंबईकडून ५ सामने खेळल्यानंतर ट्रेंट बोल्टमुळे त्याला संधी मिळणे अवघड झाले. संघातील एकूण ४ परदेशी खेळाडू असल्यामुळे एकाला संघातून बाहेर ठेवण्यात येईल. अशात मिचेलला यावर्षी पूर्ण हंगामात संघातून बाहेर रहावे लागू शकते.
जर लसिथ मलिंगा आणि ट्रेंट बोल्टचा फॉर्म बिघडला तर त्याची प्लेइंग इलेव्हनमध्ये सामाविष्ट होण्याची आशा वाढू शकते. मिचेलने आतापर्यंत आयपीएलमध्ये ५६ सामने खेळत ७१ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख –
फिल्डर फिल्डींगमध्ये अडथळा आणला, म्हणून बाद दिला गेलेला जगातील पहिला क्रिकेटर
सीपीएल २०२०चा थरार आजपासून, जाणून घ्या सीपीएलबद्दल ए टू झेड
आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीप: सर्वाधिक धावा व सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप-१० खेळाडू
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडच्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूने आयपीएलमधून घेतली माघार, दिल्ली कॅपिटल्सचे टेन्शन वाढले
सीपीएल २०२०: आजचा ड्रीम ११ संघ – त्रिनबॅगो नाईट रायडर्स व गयाना ऍमेझॉन वॉरियर्स
निवृत्तीची घोषणा केल्यावर धोनी-रैना ढसाढसा रडले, त्या रात्री त्यांनी….