भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. टीम इंडियाने अलीकडेच बांग्लादेशचा 2-0 असा पराभव केला आहे. न्यूझीलंडविरुद्धही संघाला हीच कामगिरी कायम ठेवायची आहे. बांग्लादेश मालिकेदरम्यान काही खेळाडू असे होते. ज्यांना संधी देण्यात आली नाही. अशा स्थितीत न्यूझीलंड कसोटी मालिकेत त्यांचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
या बातमीद्वारे आपण अशा तीन खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात ज्यांची न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड केली जाऊ शकते. यातील एक खेळाडू बराच काळ बाहेर आहे.
3.हार्दिक पंड्या
हार्दिक पांड्या बऱ्याच दिवसांपासून कसोटी संघाबाहेर आहे. दुखापतीमुळे त्याची कसोटी कारकीर्द खूपच लहान झाली. मात्र, गेल्या महिन्यात तो लाल चेंडूने सराव करताना दिसला. तेव्हापासून हार्दिकचे पुन्हा कसोटी संघात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात होती. जर त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर घ्यायचे असेल तर न्यूझीलंड मालिकेत त्याची निवड केली जाऊ शकते.
2.अभिमन्यू ईश्वरन
अभिमन्यू ईश्वरन हा भारतातील सर्वात दुर्दैवी खेळाडूंपैकी एक आहे. याचे कारण म्हणजे एवढा उत्कृष्ट प्रथम श्रेणी विक्रम असूनही त्याला अद्याप टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याची संघात निवड झाली असली तरी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. अलीकडेच इराणी चषकादरम्यान अभिमन्यू इसवरनने मुंबईविरुद्ध 191 धावांची जबरदस्त इनिंग खेळली होती. या कारणास्तव, न्यूझीलंड कसोटी मालिकेत त्याची निवड होऊ शकते. कारण तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
1. मुकेश कुमार
भारतीय संघात मुकेश कुमारची निवड होण्याची दाट शक्यता आहे. बांगलादेश मालिकेसाठी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते पण दुलीप ट्रॉफीमध्ये त्याची गोलंदाजी चांगली होती. मुकेश कुमारने भारतासाठी आतापर्यंत तीन कसोटी सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत तो पुन्हा एकदा टीम इंडियात पुनरागमन करू शकतो.
हेही वाचा-
WTC गुणतालिकेत पाकिस्तान तोंडघशी! इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर वाईट परिस्थिती, भारताचं स्थान जाणून घ्या
‘संपूर्ण जग हसत…’, पाकिस्तानचा हा माजी दिग्गज बाबर आझमवर संतापला
पाकिस्तानची घरच्या मैदानावर फजिती, पहिल्या डावात 556 धावा करूनही लाजिरवाणा पराभव