मुंबई। वानखेडे स्टेडियवर गुरुवारी (१२ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघात सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने ५ विकेट्सने विजय मिळवला. हा मुंबई इंडियन्सचा तिसरा विजय होता. पण त्यांचे या आयपीएल हंगामातील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. मात्र, आता त्याचबरोबर या सामन्यात पराभूत झाल्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचे देखील आयपीएल २०२२ हंगामातील आव्हान संपुष्टात आले आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईची फलंदाजी निराशाजनक राहिली. केवळ एमएस धोनीने (MS Dhoni) ३० धावांचा टप्पा ओलांडला. त्याने नाबाद ३६ धावा करताना चेन्नईला ९७ धावापर्यंत पोहचवले. मुंबईकडून डॅनिएल सॅम्सने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्यानंतर ९८ धावांचे आव्हान मुंबई इंडियन्सने १४.५ षटकात पूर्ण केले. त्यामुळे चेन्नईचा पराभव झाला. मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक नाबाद ३४ धावांचे योगदान दिले. चेन्नईकडून मुकेश चौधरीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या (Chennai Super Kings vs Mumbai Indians).
चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) हा आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील ८ वा पराभव होता. चेन्नईच्या या पराभवामागे कोणती महत्त्वाची कारणे असू शकतात याचा आढावा घेऊ.
फलंदाजी सर्वात निराशाजनक
या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी योग्यही ठरवला होता. कारण चेन्नईची फलंदाजी सुरुवातीपासूनच गडगडली. चेन्नईने पहिल्या ६ षटकातच २९ धावांवर ५ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याला दुसऱ्या बाजूने कोणाचीही भक्कम साथ मिळाली नाही. त्यामुळे चेन्नईला केवळ ९७ धावाच करता आल्या.
सुरुवातीला डीआरएस उपलब्ध नसणे
या सामन्यात सुरुवातीलाच एक नाट्य पाहायला मिळाले होते. चेन्नईचा सलामीवीर फलंदाज डेवॉन कॉनवे जेव्हा पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पायचीत झाला, तेव्हा डिसीजन रिव्ह्यू सिस्टीम (डीआरएस) उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्याला मैदानावरील पंचांच्या विरोधात जाता आले नाही. पण, अशी शक्यता वर्तवली जात होती, की चेंडू लेगस्टंपला लागत नव्हता. त्यामुळे जर कदाचीत डीआरएस उपलब्ध असता, तर कॉनवेची विकेट वाचू शकली असती आणि चेन्नईची पुढची एवढी पढझड झाली नसती. सामन्याच्या सुरुवातीच्या काही षटकांदरम्यान स्टेडियममध्ये वीजपुरवठा खंडीत झाला असल्या कारणाने डीआरएस उपलब्ध नव्हता.
दबाव टाकण्याची संधी गमावली
चेन्नईने ९८ धावांचे माफक आव्हान दिल्यानंतरही गोलंदाजीत सुरुवातीला चांगली कामगिरी केली होती. चेन्नईने पहिल्या ५ षटकातच मुंबईच्या ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी मुंबईच्या ३५ धावाही झाल्या नव्हत्या. यानंतर चेन्नईकडे मुंबईवर दबाव टाकण्याची संधी होती. पण, तिलक वर्मा आणि हृतिक शोकिन यांनी मुंबईचा डाव सावरत चेन्नईच्या विजयाच्या आशेवर पाणी फेरले. या दोघांनी ५ व्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. त्यामुळे नंतर चेन्नईला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
“आम्ही भारताच्या मागे का पळावे?, त्यांना आमच्या विरोधात खेळायचे असेल तर त्यांनी पाकिस्तानात यावे”
रोहितला पहिल्यांदा भेटल्यावर काय होत्या भावना? तिलक वर्मा म्हणतोय, ‘गळाभेट घ्यायची होती आणि…’