न्यूझीलंडविरुद्ध टी२० आणि कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाला आगामी काळात दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात भारताला २६ डिसेंबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. यासाठी बीसीसीआयने ८ डिसेंबरला कसोटी संघाची घोषणा देखील केली आहे. रोहित शर्माला या संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली गेली आहे. अजिंक्य रहाणेच्या खराब फॉर्ममुळे त्याच्याकडून हे पद काढून घेण्यात आले आहे. कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने १८ खेळाडूंना संघात सामील केले आहे, तर चार खेळाडूंना स्टॅडबायमध्ये ठेवले आहे.
संघात हनुमा विराही, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत आणि शार्दुल ठाकूर यांनी पुनरागमन केले आहे. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि शुभमन गिल तंदुरुस्त नसल्यामुळे त्यांना या मालिकेसाठी निवडले गेले नाही. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजार आणि इशांत शर्मा हे तिघे खराब फॉर्ममध्ये असले तरीदेखील त्यांना या मालिकेत संधी दिली गेली आहे. श्रेयस अय्यर आणि मयंक अगरवाल यांनी न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत महत्वाची भूमिका साकारली होती, याच पार्श्वभूमीवर त्यांना देखील संघात कायम ठेवले आहे.
अशात काही खेळाडू असे राहिले आहेत, ज्यांना संघात स्थान मिळेल अशी सर्वांना खात्री होती, मात्र त्यांनी संधी मिळालेली नाही. आपण या लेखात अशाच तीन खेळाडूंवर नजर टाकणार आहोत, ज्यांना दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर निवडले जाण्यची शक्यता होती, पण त्यांना संधी मिळालेली नाही.
तीन खेळाडू ज्यांनी दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी संधी मिळालेली नाही.
३. केएस भरत (KS Bharat) –
न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात केएस भरतला यष्टीरक्षण करण्याची संधी मिळाली होती आणि त्याने या संधीचा पुरनेपूर फायदा घेत चांगले प्रदर्शन करून दाखवले होते. असे असले तरी, त्याला दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी निवडले गेले नाही. भरतच्या यष्टीरक्षणाची गुणवत्ता सर्वांनाच माहिती आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये देखील चांगले प्रदर्शन केले आहे. अशात या दौऱ्यासाठी रिद्धिमान साहाच्या जागी त्याला संधी मिळू शकत होती, पण निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला नाही.
२. वॉशिंग्टन सुंदर (washington sundar) –
वॉशिंगटन सुंदरने यावर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अप्रतिम प्रदर्शन केले होते. यानंतर त्याला संघातील महत्वाचा खेळाडू मानले जावू लागले होते. त्यानंतर त्याला इंग्लंड दौऱ्यात देखील संधी मिळाली होती. मात्र, दुखापतीमुळे त्याला या संपूर्ण दौऱ्यातून माघार घ्यावी लागली होती. असे असले तरी, सुंदर सध्या पूर्णपणे तंदुरुस्त आहे. अशात जडेजा आणि अक्षर पटेलच्या अनुपस्थितीत त्याला संधी मिळण्याची पूर्ण शक्यता होता, पण तसे झाले नाही. निवडकर्त्यांनी आगामी दौऱ्यात त्याच्या जागी अश्विन आणि जयंत यादव यांच्यावर जास्त विश्वास दाखवला आणि त्यांना संघात सामील केले आहे.
१. अभिमन्यु ईश्वरन (Abhimanyu Easwaran) –
बंगालचा उत्कृष्ट फलंदाज अभिमन्यु इश्वरन मागच्या बऱ्याच दिवसांपासून निवडकर्त्यांच्या नजरेत आहे, पण अद्याप त्याला संधी मिळालेली नाही. आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्यात देखील त्याला संघात सामील केले गेले नाही. भारत अ संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यात ईश्वरनने चांगली फलंदाजी केली होती. अशात भारताच्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यात संघात स्थान मिळण्यासाठी तो नक्कीच प्रबळ दावेदार होता.
महत्वाच्या बातम्या –
ऑसी दिग्गज म्हणतोय, “स्टोक्स एकटा तिघांच्या बरोबर, मात्र…”
वडिलांनी सोडलेली पर्मेनंट नोकरी; आज ‘यश’ बनलाय टीम इंडियाचा कर्णधार
हुर्रे! काश्मिरच्या ‘या’ स्थानिक क्रिकेटरची लागली लॉटरी, रोहितच्या मुंबईकडून ट्रायलसाठी आलं बोलावणं