कोरोना विषाणूमुळे आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले आहे. १९ सप्टेंबर २०२० रोजी आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरुवात होईल. आयपीएलची तारीख जसजशी जवळ येत आहे. तसतसे सर्व संघांची तयारीही वेगवान होत आहे. वेळापत्रकानुसार आयपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल.
आयपीएलमध्ये दरवर्षी अनेक युवा खेळाडूंना संधी दिली जाते. चांगली कामगिरी करून हे खेळाडू केवळ विश्व क्रिकेटमध्येच आपला ठसा उमटवत नाहीत तर आपल्या राष्ट्रीय संघातही स्थान मिळवतात.
आयपीएलच्या या हंगामात बरेच युवा खेळाडू खेळताना दिसणार आहेत. काही खेळाडूंचा हा पहिला आयपीएल हंगाम असेल. ते या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण करतील. या लेखात आपल्या पहिल्या आयपीएल सत्रात सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकण्यासाठी शर्यतीत असणाऱ्या ३ युवा फलंदाजांबद्दल जाणून घेऊया.
आयपीएल पदार्पणातच सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकू शकतात हे ३ युवा फलंदाज
३. जोश फिलिप – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
जोश फिलिप हा ऑस्ट्रेलियाचा युवा क्रिकेटपटू आहे. या आयपीएलच्या लिलावात जोश फिलिपला आरसीबीने त्यांच्या संघात समाविष्ट केले आहे. आरसीबीकडून जर त्याला सातत्याने संधी मिळाली, तर त्याच्यात इतकी क्षमता आहे की तो त्याच्या पहिल्या आयपीएल सत्रात सर्वाधिक धावा करू शकेल. जोश फिलिपने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही, परंतु बिग बॅश लीगमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे.
२०१९ बिग बॅश लीगमध्ये जोश फिलिपने सुमारे १३० च्या स्ट्राइक रेटने ४८७ धावा केल्या आहेत. सिडनी सिक्सर्स विरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने २९ चेंडूत अर्धशतक झळकावून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या महत्वाच्या खेळीमुळे त्याला सामनावीर म्हणूनही निवडले गेले. तो असा एक फलंदाज आहे जो कमी चेंडूवर अधिक धावा करू शकतो. मात्र, त्याला आरसीबीच्या अंतिम अकरामध्ये नियमित स्थान मिळते की नाही हे पाहणे बाकी आहे.
२. यशस्वी जयस्वाल – राजस्थान रॉयल्स
या आयपीएलच्या लिलावात यशस्वी जयवासलला राजस्थान रॉयल्सच्या संघाने २.४० कोटींच्या प्रचंड रकमेवर विकत घेतले. यावर्षी १९ वर्षांखालील विश्वचषकात यशस्वी जयस्वालची जबरदस्त कामगिरी होती आणि त्याने बऱ्याच धावा केल्या होत्या.
यशस्वी जयस्वाल हा एक सलामी फलंदाज आहे. त्याला राजस्थान रॉयल्स संघाने सलामीला संधी दिली तर तो बऱ्याच धावा करू शकतो. हा त्याचा आयपीएलचा पहिला हंगाम असेल, पण धावांच्या बाबतीत तो महान फलंदाजांशीही स्पर्धा करू शकतो.
३. टॉम बंटन – कोलकाता नाईट रायडर्स
ख्रिस लिनसारख्या दिग्गज खेळाडूला सोडल्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सने यंदा आपल्या संघात टॉम बंटनचा समावेश केला आहे. टॉम बंटन एक जबरदस्त स्फोटक सलामीवीर फलंदाज आहे. इंग्लंडच्या युवा फलंदाज टॉम बंटनने बिग बॅश लीगमध्ये जबरदस्त डाव खेळून भरपूर धावा केल्या.
याशिवाय पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातही त्याने जबरदस्त फलंदाजी केली. टॉम बंटनने ४२ चेंडूंत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७१ धावांची धुवांधार खेळी केली. सध्या तो फारच चांगल्या फॉर्ममध्ये आहे. या हंगामात तो केकेआरसाठी निश्चितपणे डावाची सुरुवात करेल आणि अशाच प्रकारे आयपीएलच्या पहिल्या हंगामात सर्वाधिक धावा करुन तो ऑरेंज कॅप जिंकू शकतो.
ट्रेंडिंग लेख –
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५ हजार धावा करू शकणारे २ भारतीय फलंदाज
असे ३ खेळाडू, जे दिल्ली कॅपिटल्सला बनवू शकतात आयपीएल २०२० चा विजेता
आयपीएलमधील असे ५ मोठे विक्रम जे मोडणे आहे अशक्य
महत्त्वाच्या बातम्या –
‘रैना-हरभजन आयपीएलमधून बाहेर पडले म्हणून काय झालं, थाला आहे ना’
हाताच्या बोटाचे हाड तुटले तरीही मैदानात क्षेत्ररक्षण करत होता चॅम्पियन संघाचा कर्णधार
आयपीएल २०२० बाबत विराट कोहली म्हणतो, मला २०१६ सारखं…