---Advertisement---

टी२० विश्वचषक २०२१ च्या उपांत्य फेरीत धडक मारू शकणारे ४ संघ, भारताचं नाव आहे की नाही?

On: गुरूवार, सप्टेंबर 16, 2021 4:53 PM
---Advertisement---

येत्या १७ ऑक्टोबर पासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान युएई आणि ओमानमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीला सर्व संघाची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगानिस्तान या संघांचा समावेश आहे. या दोन्ही गटातून प्रत्येकी २-२ संघ उपांत्य फेरीतील सामने खेळण्यासाठी पात्र ठरणार आहेत. दरम्यान अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आणि क्रिकेट तज्ञांनी भविष्यवाणी केली आहे की, कोणते दोन संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश करणार. (4 teams to qualify semifinals of T20 world cup)

पहिल्या गटात ‘हे’ २ संघ आहेत प्रबळ दावेदार
अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचे म्हणणे आहे की, पहिल्या गटात उपांत्यफेरी गाठण्यासाठी काही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. या गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघांसारखे बलाढ्य संघ आहेत. तसेच आणखी दोन संघ पात्रता फेरीतील सामने जिंकून या गटात प्रवेश करतील. या गटात वेस्ट इंडिज आणि इंग्लंड संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघाने २०१६ मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने इंग्लंड संघाला पराभूत करून दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. तसेच या दोन्ही संघांमध्ये विस्फोटक फलंदाज आहेत, जे कुठल्याही क्षणी येऊन सामन्याचे चित्र बदलू शकतात.

दुसऱ्या गटात ‘हे’ २ संघ आहेत प्रबळ दावेदार
तसेच दुसऱ्या संघात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगानिस्तान या संघांचा समावेश आहे. तसेच आणखी दोन संघ पात्रता फेरीतील सामने जिंकून या गटात प्रवेश करतील. या गटाबद्दल बोलायचं झालं तर, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ उपांत्यफेरी गाठण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन युएई आणि ओमानमध्ये केले जाणार आहे. या मैदानांवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत असते. तसेच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आहेत. तसेच या संघातील फलंदाज फिरकी गोलंदाजांना देखील चांगलं खेळतात. या कारणास्तव, हे दोन्ही संघ या वर्षी उपांत्य फेरी गाठण्यासाठीच नव्हे तर जेतेपद पटकावण्यासाठी देखील प्रबळ दावेदार आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएलच्या थरारासाठी आरोग्य विभागही सज्ज, असे असणार नवे नियम

ऑस्ट्रेलियाची एलिसा हेलीही आहे ‘हिटमॅन’ची जबरा फॅन; म्हणाली, ‘त्याच्याकडून खूप प्रेरणा मिळते’

सर्व चौकटी मोडून जगात क्रिकेट समालोचनाचा आदर्श घालून देणारी नेरोली मिडोज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---