पुणे। महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनच्या वतीने ४८ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट (पुरुष व महिला) स्पर्धेचे आयोजन १७ ते १९ फेब्रुवारी २०२२ दरम्यान श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे-बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित होणार असल्याची माहिती संघटनेचे महासचिव श्री शैलेश टिळक यांनी एका पत्रकाद्वारे दिली.
टिळक यांनी पुढे नमूद केले की, यावर्षा पासून पोलिस दलातील ज्यूदो खेळाडूंना त्यांच्या स्वतंत्र संघाद्वारे राज्य स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. १५ वर्षावरील पुरुष आणि महिला गटातील स्पर्धक प्रत्येकी सात अशा १४ वजनगटात आपले प्रदर्शन करतील. या स्पर्धेतून राज्याच्या संघाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येईल.
या स्पर्धेमध्ये क्रीडा प्रबोधिनी, महाराष्ट्र राज्य पोलिस दल आणि २७ जिल्हयांचे ज्यूदो संघ सहभागी होतील. स्पर्धेसाठी पुण्याचे दीपक होले यांची स्पर्धा संचालकपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अॅड. धनंजय भोंसले यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आझम महिला क्रिकेट टी-२०स्पर्धा: मेट्रोइट्स, जनादेश संघाची आगेकूच कायम
मयंक नाहीतर ‘हा’ असणार पंजाब किंग्सचा नवा कर्णधार?
‘कपडे घाला आणि निघा’, चारू शर्मांनी सांगितले अशी मिळाली मेगा लिलावात ऑक्शनरची जबाबदारी