जगात सर्वाधिक विक्रम कोणत्या खेळात होत असतील तर अर्थातच क्रिकेट असेच नाव पुढे येईल. कसोटी, वनडे किंवा टी२० क्रिकेट किंवा या तिन्हींचे एकत्र विक्रम हे सतत होतं असतात. कधी फलंदाज, कधी गोलंदाज, कधी क्षेत्ररक्षक, कधी पंच, कधी सामनाधिकारी एवढंच नाही तर प्रेक्षकही कधी कधी क्रिकेटमध्ये विक्रम करतात.
शहर, स्टेडियम व बॅट्स यांच्या नावानेही अनेक विक्रम क्रिकेटमध्ये झालेले आहेत. काही विक्रम हे हवेहवेसे वाटणारे असतात तर काही विक्रम हे नकोसे वाटणारे असतात. काही विक्रम हे या दोनही प्रकारातील नसून एका वेगळ्याच प्रकारातील असतात. सध्या त्यांना आपण विचित्र विक्रम म्हणू. (5 cricketers and the unlikely records they hold.)
या लेखात क्रिकेटमधील अशाच ५ विचित्र विक्रमांचा आढावा घेऊयात-
५. गॅरी सोबर्स
वेस्ट इंडिजचे महान अष्टपैलू गॅरी सोबर्स हे कसोटी क्रिकेटमधील एक मोठं नाव. त्यांनी वेस्ट इंडिज क्रिकेटला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. सोबर्स विंडीजकडून ९३ कसोटी सामने खेळले. यात त्यांनी ५७.७८च्या सरासरीने ८०३१ धावा केल्या. तसेच २३५ विकेट्सही घेतल्या.
वनडे कारकिर्दीत मात्र एवढ्या मोठ्या क्रिकेटरने केवळ एकच सामना खेळला. त्या सामन्यातही शुन्य धावेवर ख्रिस ओल्ड नावाच्या गोलंजदाजाकडून बाद झाले. याच सामन्यात त्यांनी गोलंदाजीत ६३ चेंडूत ३१ धावा देत एका फलंदाजाला बाद केले. विशेष म्हणजे तो फलंदाज ख्रिस ओल्ड हाच होता.
४. मुथय्या मुरलीधरन
मुरलीधरन हा वनडे व कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे, हे सर्वांना माहित आहेच. परंतु मुरली क्वचित कधी कधी फलंदाजीही चांगली करत असे. असे असले तरी मुरलीच्या नावावर एक अतिशय खराब विक्रम आहे. वनडे क्रिकेटमध्ये ३०० सामने खेळलेले २१ खेळाडू आहेत. त्यापैकी पुर्णवेळ गोलंदाज हे चामिंडा वास, वसिम अक्रम व मुरली असे तिघेच आहेत. या २१ खेळाडूंमध्ये मुरलीधरन हा एकमेव असा खेळाडू आहे ज्याला वनडे कारकिर्दीत १ हजार धावा करता आल्या नाहीत. मुरलीने ३५० सामन्यात १६० डावांत फलंदाजी करताना ६.८०च्या सरासरीने ६७४ धावा केल्या आहेत. यात ६३ वेळा तो नाबाद राहिला.
३. कुमार संगकारा
श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकाराने वनडेत ४०४ सामने खेळले आहेत. ४०० किंवा अधिक वनडे सामने खेळणारा तो जगातील केवळ चौथा खेळाडू आहे. जागतिक क्रिकेटमध्ये २१ खेळाडूंनी ३०० किंवा अधिक वनडे सामने खेळले आहेत. त्यातील संगकारा हा एकमेव असा खेळाडू आहे ज्याला एकही विकेट घेता आली नाही. अगदी एमएस धोनी (१), रिकी पाॅटींग (३), इंझमाम उल हक (३), राहुल द्रविड (४) व माहेला जयवर्धने (८) यांनीही वनडे विकेट्स घेतल्या आहेत.
2. फक्त यष्टीरक्षण
एडम गिलख्रिस्ट, मार्क बाऊचर, कुमार संगकारा व एमएस धोनी हे जगातील असे यष्टीरक्षक आहेत ज्यांनी २८० किंवा अधिक वनडे खेळले असून त्यात ३००पेक्षा जास्त झेल घेतले आहेत. यापैकी एडम गिलख्रिस्ट (४१७), मार्क बाऊचर (४२४), कुमार संगकारा (३८३) व एमएस धोनी(३२१) झेल त्यांनी यष्टीमागे घेतले आहेत. परंतु त्यांनी कधीही कारकिर्दीत एकही झेल क्षेत्ररक्षक म्हणून घेतला नाही.
१. राहुल द्रविड
जागतिक क्रिकेटमध्ये राहुल द्रविड टिच्चून फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. कशीही खेळपट्टी असेल तरीही द्रविड त्यावर फलंदाजी करेलच असाच कायम कर्णधाराला विश्वास असायचा. द्रविड कसोटीत एकूण १६४ सामने खेळला. यात त्याने ३१२५८ चेंडूंचा सामना केला. परंतु असा एक विक्रम द्रविडच्या नावावर आहे ज्यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. द्रविड कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५५वेळा त्रिफळाचीत झाला आहे. ५० कसोटी सामन्यातील ५५ डावांत द्रविड त्रिफळाचीत झाला आहे. याचाच अर्थ तो ५ वेळा तर एकाच सामन्यात दोन वेळा त्रिफळाचीत झाला आहे.
ट्रेडिंग बातम्या-
–सर्वाधिक वनडे सामन्यांत एकदाही शुन्यावर बाद न होणारे ५ खेळाडू
–…आणि कसोटी क्रिकेटमधील सर्वात निचांकी धावांचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर झाला
–एवढ्या मोठ्या बोर्डावर निवड होणारा गांगुली पहिलाच भारतीय व्यक्ती