चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघातील सामन्याने काल (१९ सप्टेंबर) आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा श्रीगणेशा झाला. या सामन्यात एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नईने बाजी मारली. संघातील २ दमदार खेळाडू सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांच्या गैरहजेरीतही संघाचे प्रदर्शन दमदार राहिले. त्यांनी ५ विकेट्सने मुंबईला पराभूत करत विजयाची पताका लावली.
चेन्नईच्या या विजयात तसं तर संघातील सर्व खेळाडूंचे योगदान राहिले आहे. परंतु ५ खेळाडूंच्या अफलातून प्रदर्शनामुळे संघाला दणदणीत विजय मिळवण्यात यश आले. आम्ही तुम्हाला चेन्नईच्या त्याच ५ खेळाडूंची माहिती सांगणार आहोत. 5 Cricketers Who Contributed Lot In CSK Win Against MI
फाफ डू प्लेसिस
दक्षिण आफ्रिकाचा ३६ वर्षीय खेळाडू फाफ डू प्लेसिसने मुंबई विरुद्धच्या पहिल्या आयपीएल सामन्यात अष्टपैलू प्रदर्शन केले. त्याने क्षेत्ररक्षण करत असताना सीमारेषेजवळ २ शानदार झेल पकडत सामन्याचा कायापालट केला. त्याने सर्वप्रथम मुंबईचा डाव एका बाजूने पुढे नेणाऱ्या सौरभ तिवारीचा अप्रतिम झेल पकडला. त्यानंतर हार्दिक पंड्या आणि जेम्स पॅटिसनलाही त्याने झेलबाद केले.
याव्यतिरिक्त फलंदाजी करत असतानाही डू प्लेसिसने नाबाद ५८ धावांची खेळी केली. त्याने ४४ चेंडूत ६ चौकार मारत ही धावसंख्या गाठली. त्याने या दमदार प्रदर्शनामुळे संघाला विजय मिळवण्यात मोलाचे योगदान दिले.
अंबाती रायडू
३४ वर्षीय फलंदाज अंबाती रायडू हा कालच्या सामन्यातील सामनावीर ठरला. त्याने ६ बाद २ अशा अवस्थेत चेन्नई असताना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत शानदार अर्धशतकी खेळी केली. ४८ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकार मार्त त्याने ७१ धावा केल्या. यासह त्याने फाफ डू प्लेसिससोबत मिळून तिसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची भागिदारीही केली. त्याच्या या खेळीमुळे संघाला मुंबईचे १६३ धावांचे लक्ष्य पूर्ण करण्यात हातभार लाभला.
सॅम करन
इंग्लंडचा २२ वर्षीय क्रिकेटपटू सॅम करन याने मुंबईविरुद्धच्या पहिल्या आयपीएल सामन्यात तिन्ही विभागातही दमदार कामगिरी केली. त्याने क्षेत्ररक्षण करत असताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्याकुमार यादव यांचे झेल पकडले. तर गोलंदाजी करत असताना क्विंटन डी कॉकला बाद केले. याव्यतिरिक्त फलंदाजी करत असतानाही ६ चेंडूत त्याने १८ धावांची खेळी केली.
रविंद्र जडेजा
चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याने सामन्यातील १५वे षटक टाकत सौरभ तिवारी आणि हार्दिक पंड्या यांची विकेट चटकावली. त्याच्या या विकेट्समुळे सामन्याचा कायापालट झाला. याव्यतिरिक्त फलंदाजीला उतरल्यानंतर त्याने ५ चेंडूत महत्त्वपूर्ण १० धावा केल्या.
पियूष चावला
पहिल्यांदा चेन्नईकडून खेळणाऱ्या पियूष चावलाने पहिल्याच सामन्यात कमालीचे गोलंदाजी प्रदर्शन केले. त्याने गोलंदाजी करत असताना ४ षटके टाकत सर्वात कमी २१ धावा दिल्या. दरम्यान त्याने कर्णधार रोहित शर्माची महत्त्वपूर्ण विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
सामना जिंकूनही धोनी दिसला नाही समाधानी; हे आहे कारण
फाफ डू प्लेसिसचा सल्ला न ऐकणे मुरली विजयला पडले भलतेच महागात
पहिल्या आयपीएल सामन्याआधी एमएस धोनीने विचारला असा प्रश्न की सर्वजण झाले आश्चर्यचकीत
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष: राशिद खान विषयी माहित नसलेल्या ५ खास गोष्टी…
सौरभ तिवारी आणि मुंबई इंडियन्स ‘ये रिश्ता कुछ तो कहलाता है’
‘तो’ संघ जो आयपीएलची सुरुवात होण्याआधीच बनतो अंतिम सामन्याचा दावेदार!