---Advertisement---

Valentines Day Special : जेव्हा भारतीय क्रिकेटपटूंनी केले बॉलीवूड तारकांशी लग्न, वाचा ५ हटके प्रेमकहान्या

On: सोमवार, फेब्रुवारी 14, 2022 1:00 PM
---Advertisement---

प्रेमाचा रस्ता काट्याकुट्याचा आहे, असे मोठे लोक म्हणतात. परंतु या रस्त्यावर बरेच मोठे खेळाडू फिरताना दिसतात. बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर यांच्यातील संबंध खूप जुना आहे. बॉलिवूड अभिनेत्रींवर अनेक भारतीय क्रिकेटर्सचे हृदय आले आहे.

त्यातील काही प्रेमकथा लवकर संपल्या, तर बर्‍याच आयुष्याच्या शेवटपर्यंत गेल्या. विराट कोहली-अनुष्का शर्मा जवळजवळ ४ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ मध्ये लग्न करून एकमेकांचे झाले.

अनुष्का-विराटखेरीज बॉलिवूड-क्रिकेट अशी जोडी असलेल्या बऱ्याच यशस्वी प्रेमकहान्या आहेत. तर आपण या लेखात ५ अशा खेळाडूंबद्दल जाणून घेऊया ज्यांनी बॉलिवूड अभिनेत्रींना आपले जीवनसाथी निवडले.

१) मंसूर अली खान पटौदी – शर्मिला टागोर
भारतीय क्रिकेट संघाचे आतापर्यंतचे सर्वात तरुण कर्णधार नवाब मन्सूर अली खान पटौदी इतके देखणे होते की, सामान्य मुलीच नव्हे तर बॉलिवूडच्या सर्व अभिनेत्रीनीही त्यांच्यावर जीव ओवाळून टाकत. पण, पटौदी यांनी त्यावेळची बॉलिवूडची राणी शर्मिला टागोर यांना निवडले.

असे म्हणतात की, प्रेमात लोक वय, धर्म, जाती अशी बंधने तोडतात. मन्सूर अली पटौदी आणि शर्मिला टागोर यांनी लग्न करून एक आदर्श निर्माण केला होता. दोघेही धर्माची बंधने तोडत एकमेकांचे जीवनसाथी बनले. त्यांना दोन मुले सैफ अली खान आणि सोहा अली खान आहेत. दोघेही बॉलिवूड इंडस्ट्रीचे तारे आहेत. बॉलीवूड आणि क्रिकेट यांच्यातील प्रेम आणि लग्नाची कहाणी शर्मिला टागोर-मन्सूर अली पटौदीच्या लग्नापासूनच सुरू झाली.

२) हार्दिक पांड्या – नताशा स्टॅनकोव्हिक
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोव्हिकदेखील क्रिकेट आणि बॉलिवूड कनेक्शनचा एक भाग आहेत. २०१९ मध्ये पंड्या आणि नताशा अनेक वेळा एकत्र दिसले. तसेच, त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांचे संबंध लपू शकले नाहीत.

हार्दिक एक क्रिकेटर आहे आणि नताशाने सत्याग्रह चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ती फुकरे रिटर्न्स, द बॉडी अशा चित्रपटांमध्ये दिसली आहे. झलक दिखला जा, बिग बॉस सारख्या रिऍलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती.

हार्दिकने २०२० मध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला नताशाशी लग्न केले. मार्चपासून कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागल्याने हार्दिक-नताशाचे लग्न धुमधडाक्यात होऊ शकले नाही. परंतु, त्याने मेच्या शेवटच्या आठवड्यात लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. यात, हार्दिक-नताशाचे लग्न साध्या पद्धतीने झाले असून नताशा गर्भवती असल्याचे समोर आले. ३० जुलै रोजी नताशाने एका मुलाला जन्म दिला आणि हार्दिक पिता बनला. हार्दिक आणि नताशा सोशलमीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहतात.

३) जहीर खान – सागरिका घाटगे
आपल्या घातक गोलंदाजीने विरोधी फलंदाजांना बाद करणार्‍या जहीर खानला बॉलिवूड स्टार सागरिका घाटगेने क्लीन बोल्ड केले. खरेतर, आधी जहीरचे प्रेमप्रकरण बॉलिवूड अभिनेत्री ईशा शर्वाणीसोबत असल्याची चर्चा होती. २०११ सालच्या विश्वचषका दरम्यान ईशा जहीरसोबत दिसली होती.

पण, ईशा आणि जहीरची प्रेमकथा शेवटपर्यंत जाऊ शकली नाही. आयपीएल २०१६ च्या आधी जहीरने शाहरुख खानच्या चक दे ​​इंडिया या चित्रपटाची अभिनेत्री सागरिका घाटगेशी लग्न केले तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. कारण, जहीर-सागरिकाच्या नात्याबद्दल चाहत्यांना काहीच माहित नव्हते. आता, त्यांच्या लग्नाला ४ वर्षे झाली आहेत आणि अजूनही दोघांमधील प्रेम दिसून येते.

४) युवराज सिंग – हेजल कीच
क्रिकेटजगतामध्ये षटकारांचा बादशहा म्हणून प्रसिद्ध असलेल्या युवराज सिंगचे बॉलीवूडशी जुने नाते आहे. त्याचे नाव अनेक बॉलीवुड अभिनेत्रींशी जोडले गेले आहे. दीपिक पादुकोण, किम शर्मा, प्रीती झिंटा या सर्वांशी त्याचे प्रेमसंबंध राहिल्याचे सांगितले जाते.

पण शेवटी, युवीला त्याचे प्रेम बॉलिवूड इंडस्ट्रीमधूनच मिळाले. बॉलिवूडमध्ये सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हेजल कीचने, २०११ मध्ये बॉडीगार्ड चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

काही दिवस एकत्र राहिल्यानंतर, २०१६ सालामध्ये युवराज आणि हेजल यांनी लग्न केले. लग्नानंतर, युवराजच्या वाईट काळातही हेजल युवराज सोबत उभी राहिली.

५) मोहम्मद अजहरुद्दिन – संगीता बिजलानी
बॉलिवूड अभिनेत्रींच्या सौंदर्याने घायाळ झालेल्या खेळाडूंच्या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा देखील समावेश आहे. अझरुद्दीनचे १९७८ मध्ये नौरेनसोबत लग्न झाले होते. त्यांना २ मुलेही होती. पण, त्यानंतर अझरुद्दीनचे हृदय बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री संगीता बिजलानीवर आले.

अझरुद्दीनने नौरिनशी घटस्फोट घेतला आणि १९९७ मध्ये संगीता बिजलानीशी लग्न केले. अजहरुद्दीन एकदाच नव्हे तर बर्‍याचदा प्रेमात पडला. २०१० च्या दरम्यान, अझरुद्दीनचे नाव बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाशी जोडले गेले होते, त्यानंतर संगीता बिजलानीबरोबरही त्याने रितसर घटस्फोट घेतला.

वाचा –

Valentines Day Special : जेव्हा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेलेल्या केन विल्यमसनची नर्सला पाहून पडली विकेट!

एकूण खेळाडू २०४ आणि करोडोंची खैरात! असा राहिला आयपीएलचा मेगा ऑक्शन

राजस्थान रॉयल्समध्ये सामील होताच चहलने घेतला पंगा! वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---