क्रिकेटर व त्यांच्या सुंदर पत्नी यांच्या चर्चा तर कायम होतात. अगदी क्रिकेटर कुणाशी डेट करतात किंवा त्यांची मैत्रीण यावरही आजपर्यंत चर्चा झालेल्या आहेत व होत असतात. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी क्रिकेट हे इतर कोणत्याही खेळापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. खेळाडू, त्यांचे वैयक्तिक जीवन, तसेच त्यांचा जीवन जगण्याचा अंदाज याबद्दल चाहत्यांना जाणून घेण्यात आनंद मिळतो. कधी कधी हे इथपर्यंतच थांबत नाही तर वैयक्तिक जीवनावरुन चाहते खेळाडूंना सोशल मीडियावर ट्रोलही करतात. हे निश्चितच चुकिचेही आहे.
खेळाडूंनी खेळाडूशी लग्न केल्यामुळे अनेक समस्या येतात. त्यातील पहिली समस्या अर्थातच जोडीदाराला वेळ देता न येणे. कारण दोनही खेळाडू कारकिर्दीच्या ऐन भरात असताना विविध देश किंवा राज्यात खेळांच्या स्पर्धांसाठी जातात. परंतु काही असेही भारतीय क्रिकेटपटू आहेत ज्यांनी महिला खेळाडूंशी लग्न केले आहे. 5 Indian sportswomen who are married to cricketers.
४. राॅबीन उथप्पा- शिथल गौथम (Robin Uthappa- Shithal Goutham)
३४ वर्षीय राॅबीन उथप्पा भारताकडून २००६ ते २०१५ या काळात ४६ वनडे व १३ टी२० सामने खेळला आहे. याचबरोबर तब्बल ११७ आयपीएल सामने खेळले आहेत.
२०१६मध्ये राॅबीनने शिथल गौथमबरोबर लग्न केले. शिथल ही माजी टेनिसपटू राहिली आहे. तीने २००१ ते २०१० या काळात टेनीस हा खेळ खेळला आहे. तिचा भाऊ अर्जुन गौथम हा देखील माजी टेनीसपटू राहिला आहे. वयाच्या ९व्या वर्षी शिथलने टेनीस खेळायला सुरुवात केली. परंतु नंतर तीला आपली कारकिर्दी पुढे घडविता आली नाही. शिथल ही बेंगलोरची रहिवाशी आहे.
३. इशांत शर्मा- प्रतिमा सिंग (Ishant Sharma- Pratima Singh)
भारतीय कसोटी संघातील सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून इशांतकडे पाहिले जाते. इशांत भारताकडून १०५ कसोटी, ८० वनडे व १४ टी२० सामने खेळला आहे. १०० कसोटी सामने खेळण्यासाठी त्याला आता केवळ ३ सामन्यांची गरज आहे. ३२ वर्षीय इशांतने डिसेंबर २०१६मध्ये वयाच्या २८व्या वर्षी प्रतिमा सिंगशी विवाह केला.
प्रतिमा ही एका अशा परिवारातून आहे ज्या परिवारातील चार सदस्यांनी भारताकडून बास्केटबाॅल खेळले आहे. प्रतिमासह तीच्या तीन बहिणी भारताकडून बास्केटबाॅल खेळल्या आहेत. प्रतिमाची मोठी बहीण दिव्याने २००६ मेलबर्न काॅमनवेल्थ स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्त्व केले होते. प्रतिमा उत्तरप्रदेशमधील जौनपुरमधील आहे. तिची बहीण प्रशांतीला पद्मश्री व अर्जून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
२. शिखर धवन- आयेशा मुखर्जा (Shikhar Dhawan- Ayesha Mukherjee)
शिखर धवनने भारताकडून ३४ कसोटी, १६७ वनडे व ६८ टी२० सामने खेळला आहे. शिखरने आयेशा मुखर्जीबरोबर लग्न केले आहे. बंगाली सुंदरी असणाऱ्या आयेशा मुखर्जीला शिखर प्रथम फेसबुक या सोशल मेडिया वेबसाईटवर भेटला होता. भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने त्याला हे नाव सुचवल्याचं शिखर म्हणतो.
आयेशाचे वडील हे भारतीय तर आई इंग्लिश होती. तिचा जन्म जरी भारतात झाला असला तरी लगेच तिच कुटुंब ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झालं. तिने नंतर किकबॉक्सिंगच प्रशिक्षण घेतलं. तसेच ती शिखरची फिटनेस गुरुही आहे. ती एक चांगली फिटनेस ट्रेनर आहे. धवन आणि आयेशा यांनी 10 वर्ष एकत्र संसार केल्यानंतर मागच्या वर्षी मात्र दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
१. दिनेश कार्तिक- दिपीका पल्लिकल (Dinesh Karthik- Deepika Pallikal)
एमएस धोनी आधी भारतीय संघातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेला दिनेश कार्तिक कधी भारतीय संघात स्थिरावला नाही. १६ वर्षांच्या कारकिर्दीत कार्तिक भारताकडून २६ कसोटी, ९४ वनडे व ६० टी२० सामने खेळला. कृष्णा कुमार दिनेश कार्तिक असे पुर्ण नाव असलेल्या कार्तिकने २००७मध्ये चेन्नईत बालमैत्रिण निकीता वंजाराशी वयाच्या २१व्या वर्षी लग्न केले. दोन्ही परिवार एकमेकांना चांगले ओळखत असल्याने त्यांनी खूपच लवकर विवाह केला. पुढे २०१२ पर्यंत हे लग्न टिकले.
पुढे भारतीय कसोटीपटू मुरली विजय (Murali Vijay) याच्याशी आपल्या पत्नीचे संबंध असल्याचे लक्षात आल्यावर कार्तिकने निकीताबरोबर घटस्फोट घेतला. २०१२नंतर एक वर्षाने कार्तिक व भारतीय स्काॅश खेळाडू दिपीका पल्लीकल एकमेकांना भेटले व ३ वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी २०१५मध्ये लग्न केले. दिपीका ही एक मोठी स्काॅशपटू आहे. पीएसएच्या क्रमवारीत पहिल्या १० खेळाडूंमध्ये येणारी ती पहिली भारतीय महिला स्काॅशपटू आहे. तिच्या नावावर कारकिर्दीत १० विजेतेपदं आहेत. २०१४ काॅमनवेल्थ गेम्समध्ये तीने जोत्स्ना चिनप्पाबरोबर सुवर्णपदक मिळवले होते. तिला अर्जुन पुरस्कार तसेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण