कसोटी क्रिकेटमध्ये सामन्यात चार निकाल लागु शकतात. सामना जिंकणे, सामना पराभूत होणे, सामना टाय होणे किंवा सामना अनिर्णित राहाणे. यातही कसोटी सामने काही वर्षांपर्यंत मोठ्या प्रमाणात अनिर्णित राहत असे. कसोटी सामने टाय तर क्वचितच होतात. जागतिक क्रिकेटमध्ये आजपर्यंत केवळ २ सामने टाय झाले आहेत. एक भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तर एक ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज.
त्यामुळे जो खेळाडू कसोटीत कर्णधारपदी असेल त्याच्या हातात जरी ही चार पर्याय असले तरी कसोटी सामना जिंकणे ही अवघड गोष्ट समजली जाते. एखाद्या खेळाडूने कर्णधार म्हणून १०० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत व ५०पेक्षा जास्त सामने जिंकले आहेत असं सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटले.
तर या लेखात आपण अशाच कर्णधारांची चर्चा करणार आहोत ज्यांनी सर्वाधिक कसोटी सामने जिंकले आहेत. (5 most successful captains in Test cricket)
५. विराट कोहली-
भारतीय संघाचा सर्व प्रकारातील कर्णधार विराट कोहली या यादीत आहे. विराटने २०१४मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रथम कसोटी कर्णधारपद काय असते याचा अनुभव चाखला होता. आजपर्यंत विराटने ५५ सामन्यांत भारतीय संघाचं नेतृत्त्त्व केले असून ३३ सामने जिंकले आहे तर १२ सामन्यात संघाला पराभव पहावा लागला आहे. १० कसोटी सामने अनिर्णित राहिले आहे. विराट कर्णधार असताना २०१४पासून भारतात केवळ एक सामना पराभूत झाला आहे. तो कसोटी सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पुणे कसोटी सामना म्हणून ओळखला जातो. विराटने आजपर्यंत ६० टक्के सामने जिंकले असून २१.८१ टक्के कसोटी सामने तो पराभुत झाला आहे.
४. क्लाईव्ह लाॅईड
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार क्लाईव्ह लाॅईडने आपल्या नेतृत्त्वाखाली दोन विश्वचषक जिंकले आहेत. जगातील एक यशस्वी कर्णधार म्हणून क्लाईव्ह लाॅईड यांच्याकडे पाहिले जाते. कसोटी ७० षटकार मारणाऱ्या लाॅईड यांनी ७४ कसोटी सामन्यांत वेस्ट इंडिजचे नेतृत्त्व केले. यात विंडीजने ३६ कसोटी सामने जिंकले तर १२ सामन्यात संघ पराभूत झाला. तब्बल २६ सामने अनिर्णित राहिले. या जिंकलेल्या सामन्यात त्यांची फलंदाजीची सरासरी ६०च्या पुढे राहिली आहे. कारकिर्दीत ४८ टक्के कसोटी सामने ते कर्णधार म्हणून जिंकले आहेत.
३. स्टिव वाॅ
ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार व एकेकाळी सर्वाधिक कसोटी सामने खेळलेला खेळाडू स्टिव वाॅ या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. वाॅने ५७ कसोटीत नेतृत्त्व करताना ४१ कसोटी सामने जिंकले आहेत तर ९ कसोटी सामन्यात पराभव पाहिला आहे. केवळ ७ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. यावरुन स्टिव वाॅ कसा कर्णधार असेल याचा अंदाज येतो. ७१.९२ टक्के कसोटी सामने स्टिव वाॅ आपल्या कारकिर्दीत जिंकला आहे. सगल १६ कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रमही स्टिव वाॅने केला आहे. या विक्रमाला लगाम घालण्याचे काम सौरव गांगुलीच्या टीमनेच केले होते.
२. रिकी पाॅटींग
रिकी पाॅटींग हा एक असा खेळाडू आहे ज्यावर अनेक चाहते जिवापाड प्रेम करतात तर काहींना त्याचा प्रचंड राग येतो. परंतु पाॅटींगला एक खडूस कर्णधार म्हणून ओळखले जाते. त्याने ऑस्ट्रेलियाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते. ७७ कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्त्व करताना त्याने ४८ विजय व १६ पराभव पाहिले होते. १३ सामने अनिर्णित राहिले होते. त्याची जिंकण्याची टक्केवारी ६२.३३ तर पराभूत होण्याची टक्केवारी २०.७७ होती. असे असले तरी तीन एशेस पराभव पाहणारा तो एकमेव ऑस्ट्रेलियन कर्णधारही राहिला आहे.
१. ग्रॅमी स्मिथ
ग्रॅमी क्रेन स्मिथ हा जगातील सर्वाधिक कसोटी खेळणारा व सर्वाधिक कसोटी जिंकणारा कर्णधार आहे. वयाच्या २२व्या वर्षा दक्षिण आफ्रिकेसारख्या जगातील एका मोठ्या संघाचे त्याने नेतृत्त्व केले होते. तेव्हा तो जगातील तिसरा सर्वात तरुण कर्णधार राहिला आहे. कसोटी कारकिर्दीत एकूण ११७ कसोटी सामने खेळलेल्या स्मिथने यातील तब्बल १०९ सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्त्व केले. म्हणजे फक्त खेळाडू म्हणून तो केवळ ८ सामने खेळला. तेही वयाची २२ पुर्ण होण्यापुर्वी. या १०९ सामन्यात त्याने दक्षिण आफ्रिकेला ५३ विजय मिळवुन दिले तर २९ पराभव दक्षिण आफ्रिकेला पहावे लागले. २७ सामने अनिर्णित राहिले. त्याची जिंकण्याची टक्केवारी ४८.६२ तर पराभूत होण्याची टक्केवारी २६.६० होती.
आकडेवारीवर आधारीत काही मनोरंजक लेख-
–टाॅप ५- वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले दिग्गज
–टाॅप ५- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले महारथी
–सध्या खेळत असलेले ५ खेळाडू ज्यांनी मिळविल्या आहेत सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच
–टॉप ५- असे खेळाडू ज्यांनी लावला होता मॅन ऑफ द सिरीजचा रतीब
–टाॅप १०: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे १० खेळाडू