कोणत्याही राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणे सोपे काम नाही. कर्णधारपद ही सर्वात मोठी जबाबदारी असते. आपल्याबरोबर अन्य १० खेळाडूंसह संघाला पुढे न्यायचे असते. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूच आपल्या देशाचे नेतृत्त्व करण्याचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न सर्वांचे पूर्ण होते असे नाही.
पण काही क्रिकेटपटूंना ही सुवर्णसंधी मिळते. तर अनेकांना मिळत नाही. काही क्रिकेटपटूंना तर संघाचे उपकर्णधारपदही मिळते परंतु त्यांना कर्णधार बनण्याती संधी मिळत नाही. या लेखातही अशा क्रिकेटपटूंचा आढावा घेतला आहे, जे त्यांच्या संघाचे अनेक उप-कर्णधार होते, त्यांना जर नियमित कर्णधारपदाची संधी मिळाली असती तर ते एक महान कर्णधार बनू शकले असते.
कोण होते ते ५ उप-कर्णधार जाणून घेऊया या लेखाच्या माध्यमातून.
1. शेन वॉर्न (Shane Warne)
ऑस्ट्रेलिय दिग्गज लेगस्पिनर गोलंदाज शेन वॉर्नला कारकिर्दीत भरपूर यश मिळाले. त्याने कसोटीमध्ये ७०० हून अधिक बळी मिळवले. त्याने ऑस्ट्रेलियासाठी विश्वचषक तसेच आयपीएलचे विजेतेपद जिंकले. पण त्याच्या कारकीर्दीत त्याने ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद सांभाळले नाही. कर्णधारपद न मिळण्याची अनेक कारणे त्याच्याकडे होती. तो नेहमीच वादात सापडायचा तसेच प्रशिक्षक बुकानन आणि स्टीव्ह वॉ यांच्याशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वॉर्न वादांपासून दूर राहिला असता तर त्याच्याकडे महान कर्णधार होण्याची क्षमता होती.
२. जॅक कॅलिस (Jacques Kallis)
जगातील सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून नावाजला गेलेला जॅक कॅलिसलाही कधीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. कॅलिस १९ वर्षाच्या कारकीर्दीत हॅन्सी क्रोनिए, शॉन पोलाक आणि ग्रॅमी स्मिथ यांच्या नेतृत्वात खेळला. स्मिथ जेव्हा कर्णधार होता तेव्हा कॅलिस उपकर्णधार होता. कॅलिसला आयपीएलमध्येही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. पण जर त्याला कर्णधारपदाची संधी मिळाली तर तो एक चांगला कर्णधार बनू शकला असता.
३. अॅडम गिलक्रिस्ट (Adam Gilchrist)
अॅडम गिलक्रिस्ट हा ऑस्ट्रेलियाचा जबरदस्त यष्टीरक्षक फलंदाज होता. पॉन्टिंगला जखमी असताना कर्णधारपदाची संधी मिळताच त्याने भारता विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा पराभव केला. वॉ, बॉर्डर, टेलरसारखे कर्णधार करू न शकलेले काम गिलक्रिस्टने केले होते.
गिलख्रिस्टने ६ कसोटी सामन्याचे नेतृत्व केले आणि ४ कसोटी सामने जिंकले. पण पॉन्टिंगच्या नेतृत्वात तो ऑस्ट्रेलियाचा उप-कर्णधार होता आणि फारशी कर्णधारपद सांभाळण्याची संधी मिळू शकली नाही. पण जर त्याला नियमिक कर्णधारपदाची संधी मिळाली असती तर तो नक्कीच एक मोठा कर्णधार झाला असता. त्याच्या नेतृत्वात डेक्कन चार्जर्सने आयपीएलमध्ये जेतेपद मिळवले.
४. क्रिस क्रेन्स (Chris Cranes)
फिक्सिंग वादात सहभागी होण्यापूर्वी ख्रिस क्रेन हा न्यूझीलंड क्रिकेटचा दिग्गज खेळाडू होता. ख्रिस सुमारे १५ वर्षे न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळला, परंतु कर्णधारपद कधीही मिळवले नाही. स्टीफन फ्लेमिंग कर्णधारपदी असताना ख्रिस हा उप-कर्णधार होता, परंतु त्याला कधीही कर्णधारपद मिळालं नाही. जर त्याला कर्णधारपद मिळाले असते तर कदाचित तो एक चांगला कर्णधार होऊ शकला असता.
५. मार्क बाउचर (Mark Boucher)
बाऊचरला काही सामने कर्णधारपदाची संधीही मिळाली. बाऊचर दक्षिण आफ्रिकेकडून १४७ कसोटी सामने खेळला, परंतु नियमित कर्णधारपदापासून तो नेहमीच लांब राहिला. दक्षिण आफ्रिका संघाचा पोलॅक जेव्हा कर्णधार होता तेव्हा बाऊचर उप-कर्णधार होता.
जेव्हा बाऊचरला कर्णधारपदासाठी विचारले गेले तेव्हा बाऊचर म्हणाले की, मला कर्णधार व्हायचे नाही, कारण यामुळे माझ्यावर अधिक दबाव येईल. तसे पाहता जर त्याने आलेली संधी स्वकारली असती तर नक्कीच एक महान कर्णधार होऊ शकला असता.