इंडियन प्रीमियर लीग 2023चा थरारक हंगाम सोमवारी (29 मे) रात्री उशिरा संपला. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सला पाच विकेट्सने पराभूत केले. एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज या विजयानंतर आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ बनला आहे. यावर्षी सीएसकेने आपली पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकली. सालाबादप्रमाणे यावर्षीही आयपीएलमधून भारतीय संघाला काही नवीन आणि युवा खेळाडू मिळाले आहेत. यात महाराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा आकडा मोठा आहे. आपण या लेखात अशाच सहा खेळाडूंचा विचार करणार आहोत, जे महाराष्ट्राचे आहेत आणि त्यांनी आयपीएल 2023 चांगल्या पद्धतीने गाजवला आहे.
आयपीएल 2023 गाजवणारे महाराष्ट्राचे सहा धुरंधर
1. यशस्वी जयस्वाल –
मुंबईकर असलेला यशस्वी जयस्वाल मागच्या काही आयपीएल हंगामांमध्ये सातत्याने चर्चेत राहिला आहे. मात्र, यावर्षीच्या आयपीएल हंगामात त्याला आपले वेगळे स्थान किंवा ओळख बनवता आली, असे आपण म्हणू शकतो. राजस्थान रॉयल्सचा हा युवा सलामीवीर अगदी पहिल्या सामन्यापासून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत होता. पण दुर्दैवाने जयस्वालचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही आणि त्याचे ऑरेंज कॅपचे स्वप्नही अपूर्ण राहिले. त्याने हंगामातील 14 सामन्यांमध्ये 48.07च्या सरासरीने आणि 163.61च्या स्ट्राईक रेटने 625 धावा केल्या. 124 ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये यशस्वी जयस्वाल पाचव्या क्रमांकावर आहे.
2. सुर्याकुमार यादव –
मुंबई इंडियन्सचा महत्वाचा फलंदाज सूर्यकुमार यादव आयपीएल 2023मध्येही चमकला. आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी सूर्यकुमार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अक्षरशः गोलंदाजांपुढे गुडघे टेकताना दिसला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने सलग तीन सामन्यांमध्ये गोल्डन डकवर विकेट गमावली होती. असे असले तरी, मुंबईकर सूर्या आयपीएलमध्ये आपल्या फ्रँचायझीसाठी पुन्हा एकदा खरा उतरला आहे. त्याने हंगामातील 16 सामन्यांमध्ये 43.21च्या सरासरीने आणि 181.13च्या स्ट्राईक रेटने 605 धावा केल्या आहेत. याद 103* हे त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन राहिले. हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सूर्यकुमारचे नाव सहाव्या क्रमांकावर आहे.
3. ऋतुराज गायकवाड –
आयपीएल 2023मध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत सातवा क्रमांक आहे ऋतुराज गायकवाडचा. चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळणारा हा सलामीवीर फलंदाज मुळचा पुण्याचा आहे. आयपीएलमधील त्याचा फॉर्म पाहून निवडकर्त्यांनी त्याला जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी निवडले होते. मात्र, तो जूनच्या पहिल्या आठवड्यात लग्न करणार असल्यामुळे हा दौरा करत नाहीये. ऋतुराजने हंगामातील 16 सामन्यांमध्ये सीएसकेसाठी 590 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 42.14 होता, तर स्ट्राईक रेट 147.50 होता. हंगातील त्याची सर्वोत्तम खेळी 92 धावांची होती.
4. शिवम दुबे –
सीएसकेसाठी वरच्या फळीत खेळणारा शिवम दुबे () यानेही आयपीएळ 2023 खऱ्या अर्थाने गाजवली. दुबेने 16 पैकी 14 सामन्यांमध्ये फलंदाजी केली आणि 418 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी धावसंख्या 38.00 होती, तर स्ट्राईक रेट 158.33चा होता. दुबने आपल्या या प्रदर्शनाच्या जोरावर सीएसकेला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवले आणि अंतिम सामन्यातही महत्वाचे योगदान देत विजय मिळवून दिला.
5. तुषार देशपांडे –
मुंबईकर तुषार देशपांडे यावर्षी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळला. वेगवान गोलंदाज तुषारने हंगामातील 16 सामन्यांमध्ये त्याने 56.5 षटके गोलंदाजी केली आहे. यात सीएसकेसाठी सर्वाधिक 21 विकेट्स घेतल्या आहेत. असे असले तरी, तुषार सीएसकेसाठी सर्वात महागात देखील पडला आहे. त्याने हंगामात एकूण 564 धावा खर्च केल्या केल्या आहेत. आयपीएल 2023मध्ये त्याचा इकॉनॉमी रेट 9.92 राहिला असून सरासरी 26.85 राहिली आहे.
6. अजिंक्य रहाणे –
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज आणि कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे यावर्षी आयपीएलमध्ये सीएसकेसाठी खेळला. रहाणेने या हंगामातील 14 सामन्यांमधील 11 डावांमध्ये 326 धावा केल्या आहेत. 71* ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या ठरली. या धावा रहाणेने 32.60च्या सरासरीने आणि 172.48च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. रहाणेने हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये केलेली कामगिरी पाहून त्याला डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी निवडकर्त्यांनी संधी दिली. अशात रहाणे इंग्लंड दौऱ्यात संघासाठी काय कमाल करतो हे पाहण्यासारखे असेल.
(6 Maharashtrian cricketers who will perform well in IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर धोनी फॅमिली इमोशनल, झिवाची वडिलांना कडकडून मिठी, पाहा व्हिडिओ
आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर अंबाती रायुडू भावूक, घरच्यांचे नाव घेत म्हणाला, ‘मी आता आयुष्यभर…’