जेव्हापासून क्रिकेट जगात टी-२० क्रिकेटचे स्वरूप आले आहे, तेव्हापासून याची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. आता टी-२० क्रिकेट अशा स्थानावर आहे जिथे आता या क्रिकेट प्रकारासाठी प्रेक्षकांच्या मनात ते एक विशेष स्थान बनले आहे. टी-२० क्रिकेटच्या स्वरूपात प्रत्येक वेळी वेगवेगळे विक्रम बनले किंवा यापुढेही होणार आहेत. संपूर्ण क्रिकेट जगात टी-२० क्रिकेट स्वरूप आज खेळले गेले आहे, ज्यात जवळजवळ सर्वच क्रिकेटींग देशांनी त्यांची टी-२० लीग सुरु केली आहे.
या टी-२० लीगमध्ये बरेच खेळाडू खेळताना दिसतात. त्यामुळे आज टी-२० क्रिकेट स्वरूप खूप मोठ्या प्रमाणात खेळले जाते. टी-२० क्रिकेट स्वरुपात फलंदाजांमध्ये धावांची चुरस आणि गोलंदाजांमध्ये विकेट मिळवण्याची चुरस रंगताना दिसते. या लेखात आपण टी-२० क्रिकेट स्वरूपात सर्वाधिक चेंडूंचा सामना केलेल्या ७ फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत.
आतापर्यंत टी-२० स्वरूपात सर्वाधिक चेंडू खेळणारे हे आहेत ते ७ खेळाडू-
७. रोहित शर्मा (Rohit Sharma) – ६४४२ चेंडू
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्माची उंची सातत्याने वाढत आहे. गेल्या काही वर्षांत रोहित शर्माने एक उत्कृष्ठ फलंदाज म्हणून आपले नाव केले. वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये भारताच्या या हिटमॅनने जबरदस्त कामगिरी केली आहे. म्हणूनच आज त्याच्यासारखा मर्यादित षटकांमध्ये जास्त धावा करणारा फलंदाज शोधणे फार कठीण आहे.
रोहित शर्माची टी-२० कारकीर्द खूप प्रभावी आहे. या स्वरूपात त्याने स्वत: ला अधिक चांगल्या प्रकारे सिद्ध केले आहे. रोहित शर्माच्या एकूण टी-२० क्रिकेट कारकीर्दीबद्दल विचार केला तर त्याने ३२८ सामने खेळले असून त्यामध्ये त्याने ६४४२ चेंडूंचा सामना केला आहे.
६. डेव्हिड वॉर्नर (David Warner)- ६४८२ चेंडू
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर या क्षणी क्रिकेट जगातील एक उत्कृष्ठ फलंदाज आहे. डेव्हिड वॉर्नरची एक वेगळीच शैली आहे. तो सुरुवातीपासूनच गोलंदाजांविरूद्ध अधिक आक्रमक होते. डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेट संघाचा एक महत्वाचा भाग आहे.
डेव्हिड वॉर्नरने टी-२० स्वरूपातही आपल्या प्रदर्शनाने उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. आपल्या देशाच्या संघातून खेळण्याव्यतिरिक्त वॉर्नर परदेशात अनेक टी-२० क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसतो. त्याने टी-२० कारकीर्दीत आतापर्यंत २८० सामने खेळले असून एकूण ६४८२ चेंडूंचा सामना केला आहे.
५. विराट कोहली (Virat Kohli)- ६६१४ चेंडू
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या क्रिकेट युगात एका वेगळ्या उंचीवर आहे. विराट कोहलीने ज्या प्रकारे क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात कामगिरी केली आहे तेपाहून त्याला सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून संबोधले जाते.
विराट कोहलीने कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये आपली चमक दाखविण्यात कसलीही कसर सोडली नाही आणि तसेच टी-२० क्रिकेट प्रकारातही त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे.
इतर खेळाडूंप्रमाणेच विराट कोहली आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल व्यतिरिक्त देशांतर्गत टी-२० सामन्यांमध्येही खेळला आहे. त्याने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत २८१ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ६६१४ चेंडू खेळले आहेत.
४. कीरोन पोलार्ड (Kieron Pollard) – ६६४१ चेंडू
वेस्ट इंडीजच्या क्रिकेटपटूंनी टी-२० फॉर्मेटमध्ये जबरदस्त खेळ दाखवले आहेत. आताच्या वेस्ट इंडीज खेळाडूंनी वनडे आणि कसोटी स्वरूपात इतके नाव कमावले नाही पण टी-२० मध्ये त्यांचे एक वेगळ्या प्रकारचे वर्चस्व आहे. वेस्ट इंडीजने आतापर्यंत या रूपात अनेक सर्वोत्कृष्ट फलंदाज दिले आहेत, त्यापैकी एक म्हणजे सध्याचा विंडीज संघाचा मर्यादित षटकांचा कर्णधार कीरोन पोलार्ड.
किरोन पोलार्डने आतापर्यंतच्या अनेक टी-२० लीगमध्ये वर्चस्व दाखवले आहे. ज्यामध्ये त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे. जगभरातील अनेक टी-२० क्रिकेट लीगमध्ये खेळलेला कीरोन पोलार्ड आतापर्यंत ६६४१ चेंडू ५०१ सामन्यात खेळाले आहेत.
३. ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) – ७२६९ चेंडू
न्यूझीलंड क्रिकेटने आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू निर्माण केले आहेत. या क्रिकेटपटूंमध्ये एखादा महान फलंदाज म्हणून नाव घ्यायचं आसेल तर न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ब्रेंडन मॅक्युलम हे नाव घेतले जाते. ब्रेंडन मॅक्युलमने न्यूझीलंडसाठी खूप अभूतपूर्व योगदान दिले आहे.
ब्रॅडेन मॅक्युलमची सर्वात खास गोष्ट म्हणजे तो तीनही स्वरूपात एक उत्कृष्ट खेळाडू होता. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. तो अनेक टी-२० क्रिकेटच्या वेगवेगळ्या लीगमध्ये खेळला आहे. त्याने आतापर्यंत टी-२० कारकीर्दीत ३७० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ७२६९ चेंडूंचा सामना केला आहे.
२. शोएब मलिक (Shoaib Malik) – ७८७७ चेंडू
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि एक अष्टपैलू खेळाडू मानला जाणारा शोएब मलिक एक उत्कृष्ठ क्रिकेटपटू आहे. शोएब मलिकने पाकिस्तान क्रिकेट संघात बराच काळ यशस्वीपणे घालवला आणि जबरदस्त कामगिरी केली. त्याने पाकिस्तानकडून तीनही स्वरुपात क्रिकेट खेळले आहेत, पण त्यापैकी टी-२० क्रिकेटमध्ये बराच काळ खेळण्यात त्याला यश आले आहे.
शोएब मलिक जगभरातील वेगवेगळ्या टी-२० क्रिकेट लीगमध्ये खेळण्यात यशस्वी ठरला. शोएब मलिकने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत ७८७७ चेंडू खेळले आहेत, जो टी-२०मध्ये दुसर्या क्रमांकाचा सर्वात जास्त चेंडू खेळणारा फलंदाज आहे.
१. ख्रिस गेल (Chris Gayle) – ९०४८ चेंडू
टी-२० क्रिकेट इतिहासातील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक म्हणजे ख्रिस गेल. तो एक स्फोटक फलंदाज आहे. ख्रिस गेलला टी-२० क्रिकेटमध्ये ‘युनिव्हर्सल बॉस’ म्हणून ओळखले जाते. ज्यांने या प्रकारात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केले आहे.
ख्रिस गेल हा क्रिकेटच्या या स्वरुपात सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके करणारा फलंदाज आहे, तसेच या स्वरूपात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. या प्रकारात त्याने आतापर्यंत ९०४८ चेंडू खेळले आहेत. यासाठी त्याला ४०४ सामने खेळावे लागले.
ट्रेंडिंग लेख –
कॅप्टन्सीची एकही संधी न मिळता सर्वाधिक कसोटी सामन्यात टीम इंडियाची सेवा करणारे ३ दिग्गज
सध्याच्या टीम इंडियाचे ३ मुख्य शिलेदार, ज्यांनी एकाही सामन्यात केली नाही कॅप्टन्सी
कोणताच क्रिकेटचाहता विसरू शकणार नाही असा झिम्बाब्वेचा नील जॉन्सन
महत्त्वाच्या बातम्या –
३३ वर्षीय मॉर्गनने वाढवले रुटचे टेन्शन, आता मोठा विक्रमही धोक्यात
३ वनडेत ८ चेंडू खेळून १ धाव करत ३ वेळा बाद होण्याचा कारनामा केलाय या खेळाडूने
दरवर्षीप्रमाणेचं एवढे दिवस गायब झालेल्या धोनीचे सीएसकेच्या चाहत्यांना खास गिफ्ट, पहा काय आहे…