क्रिकेट हा जगातील एक लोकप्रिय खेळ. क्रिकेटपटूंबाबत चाहत्यांमध्ये बराच उत्साह दिसून येतो. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडत असतं. लोक क्रिकेटपटूंबद्दल जी बातमी ऐकतात, त्यावर विश्वास ठेवतात. अगदी ती गोष्ट अफवा असेल तरीही त्यांना बऱ्याच वेळा ती खरी वाटते.
आजच्या काळात ही अफवांची प्रकरण कमी घडू लागली आहेत. याचे कारण म्हणजे खेळाडू सोशल मीडियावर आहेत. अशा वेळी काही गोष्ट माहिती असेल तर चाहते थेट खेळाडूला प्रश्न विचारतात किंवा खेळाडूही सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमातून चुकिच्या गोष्टी खोडून काढतात.
परंतु पुर्वी अनेक अफवा या क्रिकेट जगतातील खेळाडूंबद्दल पसरवल्या जात होत्या. त्यातील काही अफवा अशाही आहेत, ज्या आता ऐकून खूप हसू येतं असे. तसेच काही अशा अफवा होत्या, ज्यांवर चाहत्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवला.
आज या लेखात आपण अशाच ७ मजेदार अफवांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या एकेवेळी क्रिकेट जगतात चविने चाखल्या गेल्या. या यादीमध्ये असे काही खेळाडू आहेत, त्यांच्याबद्दलच्या अफवांमुळे कोणाला राग आला, तर काहींना या अफवांमुळे मजेशीर किस्सेही घडले.
क्रिकेट जगतातील खास अफवा 7 Hilarious Rumours Cricketers
७. रिकी पॉटिंग
रिकी पाँन्टिंग (Ricky Ponting) २००३ मध्ये कर्णधार म्हणून पहिला विश्वचषक खेळत होता. त्यावेळी त्याने फलंदाजीद्वारे चांगली कामगिरी केली. अंतिम सामन्यात त्याने भारतीय संघाविरूद्ध शानदार १४० धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे संघाने ३५९ धावांपर्यंत मजल मारली होती. याबरोबरच ऑस्ट्रेलियाने १२५ धावांनी विजय मिळवत विजेतेपद पटकावले.
त्यावेळी भारतीय चाहत्यांनी पाँन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग असल्याची अफवा उठवली होती. पाँन्टिंग अनेक मोठे फटके मारत होता. त्यामुळे कुणीतरी ही अफवा पसरवली व ती संपुर्ण भारतात पसरली होती. ही स्प्रिंग सापडल्यामुळे २००३ विश्वचषकाची फायनल परत होणार असल्याची मोठी अफवाही भारतात पसरली होती. तसेच जर फायनल झाली नाही तर भारताला ट्राॅफी देण्यात येणार असल्याची अफवाही तेव्हा पसरली होती.
पाँन्टिंगबद्दल उडवलेल्या या अफवेचे सत्य खूप वर्षांनी समोर आले आहे. अलीकडेच त्याने २००३ च्या विश्वचषकातील बॅटची पोस्ट केली होती. त्यावेळीही चाहत्यांनी त्याला स्प्रिंगबद्दल विचारले होते.
६. नवज्योत सिंग सिद्धू
माजी भारतीय सलामीवीर फलंदाज नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) आज आपल्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जाते. पण खेळताना ते अजिबात तसे नव्हते. त्यावेळी त्यांच्याबद्दल अशी अफवा पसरविली गेली होती, की सामन्यादरम्यान त्याने एका पंचाला धमकावले होते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान, जेव्हा सिद्धू फलंदाजी करत होते, त्यावेळी पाकिस्तानच्या वसिम अक्रमने (Wasim Akram) येऊन त्याला स्लेज (अपशब्द) केले होते. त्यानंतर आमिर सोहेलही त्यांना काहीतरी म्हणाला होता, जे त्यावेळी सिद्धू सहन करू शकले नाहीत.
सिद्धू यांनी आपली बॅट सोहेलच्या (Aamer Sohail) दिशेने उचलली आणि सांगितले की आज तू गेलास. पण त्यावेळी आमिर पंचांच्या जवळ उभा होता. यामुळे सिद्धूने पंचांना धमकावले असल्याचे लोकांना वाटले. बर्राच काळ लोकांना हे सत्य वाटत होतं.
५. शोएब अख्तर
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरबद्दल (Shoaib Akhtar) अनेकदा अफवा पसरत असतात. पण त्यातील एक अफवा अतिशय मजेदार होती. जेव्हा गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून तो लंडनहून परत आला, तेव्हा लोकांनी एक अफवा पसरविली, की तो ‘लिपोसक्शन’ (शस्त्रक्रिया) करून आला आहे. ही एक मोठी अफवा होती.
लिपोसक्शन म्हणजे आपल्या शरीराचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी शरीराची चरबी काढून टाकणे. अख्तरबद्दल बर्याच काळापासून या गोष्टी सांगितल्या जात होत्या. परंतु त्याने केवळ गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली असल्याचे त्याने सांगितले.
अख्तरने सिडनी मॉर्निंग हेराल्डला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, “मला लिपोसक्शनची आवश्यकता नाही. मी लठ्ठ नाही, मी एक तंदुरुस्त माणूस आहे. मी धाव घेऊन वजन कमी करू शकतो. या दाव्यांमुळे माझे जग पुरते हादरले आहे. पण मी एक तंदुरुस्त व्यक्ती आहे आणि लोक माझ्याबद्दल जे बोलतात त्यातून मला अधिक प्रेरणा मिळते.”
४. शेन वॉर्न
ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज शेन वॉर्नबद्दलही (Shane Warne) एक अफवा पसरवली गेली होती, की त्याच्या स्वप्नात सचिन तेंडुलकर येतो. सचिन (Sachin Tendulkar) जेव्हा लयीमध्ये असायचा, त्यावेळी गोलंदाजाला त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करण्यात अडचण येत असायची. वॉर्नही त्या गोलंदाजांपैकी एक आहे.
वॉर्न एका पत्रकार परिषदेत म्हणाला होता, की माझ्या स्वप्नात सचिन षटकार मारताना दिसतो. पण नंतर त्याने एका बिझनेसवर्ल्डला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “सचिन आजपर्यंत माझ्या स्वप्नात आणि विचारात आला नाही. ते कोणते वर्ष होते हेही मला आठवत नाही. परंतु त्याने खूप चांगला डाव खेळला आणि त्याने कसोटी सामना जिंकला. मी म्हणालो होती, की कदाचित सचिनच्या त्या ड्राईव्हमुळे ती भयानक स्वप्ने आहेत. मी तुम्हाला खरं सांगतो, की मी झोपेच्या वेळी सचिनचा विचार करीत नाही.”
३. स्टिव्ह वॉ
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कधीही बाद फेरी गाठली नाही. पण एक अशी संधी होती. जेव्हा ते सहजपणे हा टप्पा पार करू शकत होते. पण त्यावेळी हर्शल गिब्जने एक झेल सोडला होता. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ त्या सामन्यात पराभूत झाला. त्यावेळी द. आफ्रिका संघाला मोठा धक्का बसला होता.
तो झेल सोडल्यानंतर वॉने (Steve Waugh) गिब्जला (Herschelle Gibbs) सांगितले, की आज हर्शल तुझ्या संघासाठी हे खूप भारी पडेल. पण लोकांना असे वाटले, की तो गिब्जला म्हणाला की विश्वचषक आपल्या हातातून निसटताना तुला कसे वाटते गिब्स. पण हा लोकांचा गैरसमज होता.
त्यावेळी वॉ यांनी गिब्जला स्लेज केलं नव्हतं. उलट त्याने केलेल्या चुकीची त्याला आठवण करून दिली होती. पण लोकांनी यासाठी वॉला चूकीचे ठरवले होतं. परंतु आता लोकांना याबद्दल माहित झाले आहे.
२. एमएस धोनी
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी (MS Dhoni) त्याच्या सुरुवातीच्या कारकीर्दीत सहज लांब षटकार मारत असे. तो कुठल्याही गोलंदाजाला आणि कोणत्याही वेळी षटकार मारायचा. ज्यासाठी तो ताकदीचा वापर करतानाही दिसायचा.
त्यावेळी धोनीबद्दल अफवा पसरली होती, की तो दिवसातून ५ लिटर दूध पितो. पण ही केवळ अफवा होती. ज्यांच्याबद्दल स्वत: धोनीने सांगितलं, की तसं काही नाही. ही अफवा ऐकल्यावर काहींनी दिवसातून ५ लिटर दूध पिण्याचा प्रयत्नही केला होता.
पुढे धोनी म्हणाला, “नाही. मी पाच लिटर दूध पित नाही. मी दररोज एक लिटर दूध प्यायचो. कारण जेव्हा मी १८ वर्षांचा होतो. तेव्हा माझ्याजवळ डाळ नव्हती. परंतु तेथे तांदूळ आणि दूध असायचे.”
१. एबी डिविलिअर्स
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्स (AB De Villiers) जेव्हा जबरदस्त क्रिकेट खेळायला लागला, तेव्हा त्याच्याबद्दल अफवा पसरल्या होत्या. तो केवळ क्रिकेटच नाही, तर अनेक खेळ खेळण्याची क्षमता ठेवतो. ज्यात पोहणे, टेनिस आणि बॅडमिंटन यांसारख्या खेळांचा समावेश होता. याशिवाय तो रग्बी आणि गोल्फर असल्याचेही सांगण्यात येत होतं.
डिविलियर्सने यावर स्पष्टीकरण देत ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्समध्ये बोलताना सांगितले होते, “हे सर्व खोटं आहे. मी शाळेत १ वर्ष हॉकी खेळलो आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही फुटबॉलचा खेळ खेळलेला नाही. बॅडमिंटन कधीही खेळला नाही. मी बांगलादेशमध्ये किंवा इतर कोठेतरी मार्क बाऊचरबरोबर पाच मिनिटे खेळलो आहे. मी शाळेत प्रथमच रग्बी खेळलो होतो. रग्बी आणि क्रिकेटचा विचार केला, तर माझ्या देशातील सर्वोच्च शाळा माझी होती. मी गोल्फ खेळले आहे. जेव्हा मी १४ वर्षांचा होतो. तेव्हा मला थोडं खरचटलं होतं. त्यानंतर मी हा खेळ सोडून दिला.”
वाचनीय लेख-
-बापरे! ८०पेक्षा जास्त सामने खेळून आयपीएलमध्ये एकही चौकार मारता न आलेले क्रिकेटर
-भारतीय क्रिकेट संघाचे ‘हे’ दोन खेळाडू; जे २०२० मध्ये करू शकतात लग्न
-स्वत:च्या देशाबाहेरही चाहत्यांचे प्रेम मिळवणारे १० क्रिकेटपटू