आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारताचा प्रवास गुरुवारी (10 नोव्हेंबर) संपला. भारतीय संघाने एडिलेड ओव्हल मैदानावर इंग्लंडविरुद्ध उपांत्य सामना खेळताना तब्बल 10 विकेट्सने पराभव स्वीकारला. ग्रुप स्टेजमध्ये सर्वात जास्त चार विजय मिळवणारा भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध मात्र पूर्णपणे अपयशी ठरला. विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आल्यानतंर भारतीय संघातील 7 खेळाडू भारतासाठी रवाना होतील, तर इतर सर्वजण न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहेत.
भारत आणि न्यूझीलंड च्यांत्यात नोव्हेंबर महिन्यात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन समान्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. उभय संघांमधील टी-20 मालिका 18 नोव्हेंबरपासून वेलिंगटनमध्ये सुरू होईल. तर एकदिवसीय मालिकेची सुरुवात 25 नोव्हेंबर रोजी ऑकलॅन्डमध्ये होईल. टी-20 विश्वचषकात संघाला अपयश मिळाले असले, तरी न्यूझीलंविरुद्धच्या मालिकेत संघ विजय मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. या दोन्ही मालिकांमध्ये संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासह एकूण सात महत्वाचे खेळाडू अनुपस्थित असणार आहेत. या सर्वांनी न्यूझीलंड दौऱ्यात विश्रांती दिली गेली आहे.
हे खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यात उपस्थित नसणार –
रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली (KL Rahul), सलामीवीर केएल राहुल, यष्टीरक्षक दिनेश कार्तिक, फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन, अष्टपैलू अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हे सर्वजण न्यूझीलंड दौऱ्यात उपस्थित नसतील. संघ व्यवस्थापनाने या महत्वाच्या सर्व खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती दिली आहे. एवढेच नाही, संघाचा नियमित सपोर्ट स्टाफ देखील न्यूझीलंड दौऱ्यात नसेल. एनसीएसचे प्रमुख आणि त्यांचे इतर सहकारी न्यूझीलंड दौऱ्यात भारताच्या सपोर्ट स्टाफची भूमिका पार पाडतील. टी-20 मालिकेत हार्दिक पंड्या संघाचे कर्णधारपद भूषवेल, तर एकदिवसीय मालिकेत शिखर धवन भारताचे नेतृत्व करताना दिसेल.
न्यूझीलंडविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारतीय संघ –
हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक आणि उपकर्णधार), संजू सैमसन (यष्टीरक्षक), वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार और उमरान मलिक.
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), संजू सैमसन (यष्टीरक्षक), वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल , कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन और उमरान मलिक. (7 indian players will return to india from australia and other will go to new zealand for t20 and odi series )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्मा किती दौऱ्यांमध्ये संघासोबत होता? ‘असे’ चालत नाही! अजय जडेजांची परखड टीका
‘या’ 5 चुका आधीच सुधारल्या असत्या, तर भारत पाकिस्तानविरूद्ध खेळला असता फायनल