भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात ९७ तर दुसऱ्या डावात नाबाद ५४ धावांची खेळी केली आहे.
याबरोबर विराटने एक खास विक्रही केला आहे. कसोटीत तब्बल ९ वेळा विराटने दोन्ही डावात ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
केवळ ६९ सामन्यात विराटने हा पराक्रम केला आहे. विराटने हा पराक्रम करताना सर्वात कमी कसोटी सामने खेळले आहेत हे विशेष.
भारताकडून कसोटीत हा पराक्रम यापुर्वी सचिन तेंडूलकर, सुनिल गावसकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी प्रत्येकी ९ वेळा केला आहे.
तर द्रविडने हा पराक्रम तब्बल १०वेळा केला आहे.
कसोटीत दोन्ही डावात सर्वाधिक वेळा ५०पेक्षा अधिक धावा करणारे भारतीय खेळाडू-
१०- राहुल द्रविड ( सामने- ६४)
९- सुनिल गावसकर (सामने- १२५)
९- व्हीव्हीएस लक्ष्मण (सामने- १३४)
९- सचिन तेंडुलकर (सामने- २००)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–सचिन-गांगुलीपाठोपाठ मोठ्या खेळाडूचं येतेयं आत्मचरित्र
–एशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक
–एशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक