मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात रविवारी डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) होणार आहेत. या दिवसातील पहिला सामना पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात होणार आहे. हा सामना डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी येथे पार पडणार असून या सामन्यात संघाने नाणेफेक जिंकून करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात पंजाबचा नियमित कर्णधार मयंक अगरवाल खेळणार नाही. त्याच्या पायाच्या बोटाला लागल्याने तो या सामन्याला मुकणार आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी शिखर धवन पंजाबचे प्रभारी कर्णधारपद सांभाळेल. शिखरने मयंकबद्दल सांगितले आहे की, तो पुढच्या सामन्यापर्यंत बरा होईल. तसेच मयंक ऐवजी अंतिम ११ जणांच्या संघात प्रभसिमरन याला संधी देण्यात आली आहे.
तसेच सनरायझर्स हैदराबादने या सामन्यासाठी आपल्या अंतिम ११ जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही.
हा सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स दोन्ही संघांचा हंगामातील प्रत्येकी ६ वा सामना आहे. आत्तापर्यंत पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात १७ सामने खेळवण्यात आले आहेत. त्यातील पंजाबने ५ सामने जिंकले आहेत आणि हैदराबादने १२ सामने जिंकले आहेत.
#SRH have won the toss and they will bowl first against #PBKS.
Live – https://t.co/WC7JjTqlLB #PBKSvSRH #TATAIPL pic.twitter.com/RjoZ8w6KEL
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2022
पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यासाठी अंतिम ११ जणांचे संघ –
सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, केन विलियम्सन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडेन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, जगदीशा सुचिथ, भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सेन, उमरान मलिक, टी नटराजन.
पंजाब किंग्स : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
IPL2022| गुजरात वि. चेन्नई सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
कर्णधार रोहितने मुंबईच्या ६ व्या पराभवानंतर चूक केली मान्य; म्हणाला, ‘मी पूर्ण जबाबदारी घेतो…’