भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने इंग्लंडविरुद्ध चेन्नईत पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात चिवट झुंज दिली होती. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या ४२० धावांच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने ७२ धावांची आतिशी खेळी केली होती. १०४ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने त्याने ही धावसंख्या उभारली होती. अखेर बेन स्टोक्सने त्यांची दांडी गुल केल्याने शतक करण्यापुर्वीच तो पव्हेलियनला परतला होता. परंतु याच विराटला आता दुसऱ्या कसोटीत मोठा विश्वविक्रम करण्याची संधी आहे.
जर विराटने दुसऱ्या कसोटीत शतक झळकावले, तर तो ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांचा मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर करेल.
विराटने आजवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार असताना ४१ शतके केली आहेत. यासह तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत संयुक्तपणे अव्वलस्थानी विराजमान आहे. विराटसह पाँटिंग यांचाही या स्थानावर ताबा आहे. अशात जर विराटने दुसऱ्या कसोटीत शतक केले, तर तो पाँटिंग यांना याबाबतीत पिछाडीवर सोडेल आणि कर्णधाराच्या रुपात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करण्याचा विश्वविक्रम नावे करेल.
तसेच दुसऱ्या कसोटी सामन्यातील शतक हे विराटचे खेळाडू म्हणून तब्बल ७१ वे आंतरराष्ट्रीय ठरेल. या ३२ वर्षीय शिलेदाराने आतापर्यंत ८८ कसोटी सामन्यात २७ शतके आणि २५१ वनडे सामन्यात ४३ शतके केली आहे.
लवकरच रंगणार दुसरा कसोटी सामना
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिल्या कसोटी सामना इंग्लंडने २२७ धावांनी खिशात घातला होता. यासह त्यांनी मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे. यानंतर आता दुसरा कसोटी सामना १३ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना १७ फेब्रुवारी रोजी संपेल.
महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष : एक नाही, दोन नाही; तब्बल ५२ वर्ष आहे अबाधित ‘या’ भारतीयाचा कसोटी विक्रम
INDvsENG : प्रेक्षकांना मिळणार स्टेडियममध्ये प्रवेश; पण तिकीट विक्रीवेळीच उडालेत नियमांचे तीन-तेरा