इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात झालेला पहिला वनडे (१३ जुलै) केनिंगटन, द ओव्हल येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने १० विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाबाद ७६ धावा केल्या आहेत. त्याच्या बरोबरीने शिखर धवनने नाबाद ३१ धावा केल्या आहेत. भारतीय पुरूष संघाचा हा इंग्लंडमध्ये वनडे प्रकारातील सर्वात मोठा विजय ठरला आहे.
भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा हा निर्णय योग्य ठरला आहे. या सामन्यात गोलंदाजांनी यजमान संघाला रोखून धरले आहे. यावेळी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) या दोघांनी मिळून तर इंग्लंडला चांगलेच उध्वस्त केले. बुमराहने ६ आणि शमीने ३ विकेट्स घेतल्या आहेत.
भारत विरुद्ध इंग्लंड पुरूष संघात झालेल्या वनडे सामन्यांमधील भारताचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. याआधी भारताने १९८६मध्ये ओव्हलवरच झालेल्या सामन्यात ९ विकेट्सने विजय मिळवला होता. यामुळे भारतासाठी द ओव्हल हे मैदान विशेष ठरले आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात २००४मध्ये नॉटींघममध्ये झालेल्या वनडे सामन्यात इंग्लंडने तो सामना ७ विकेट्सने जिंकला होता. ब्रिसबेनमध्ये २०१५ला झालेला वनडे सामना इंग्लंडने ९ विकेट्सने जिंकला होता.
भारत विरुद्ध इंग्लंड पुरूष संघ यांच्यात झालेल्या वनडे सामन्यातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विजय (विकेट्स)-
१० – भारत, २०२२ (द ओव्हल)
९ – भारत, १९८६ (द ओव्हल)
९ – इंग्लंड, १९८२ (लीड्स)
९ – इंग्लंड, २०१५ (ब्रिसबेन)
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात झालेला हा सामना चेंडूच्या फरकानेही मोठा ठरला आहे. भारताने हा सामना १८८ चेंडू शिल्लक राखत जिंकला आहे. ब्रिसबेनमध्ये २०१५ ला झालेला वनडे सामना इंग्लंडने १३५ चेंडू शिल्लक राखत जिंकला होता. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात २०१३ मध्ये रांची येथे झालेला सामना भारताने ७ विकेट्स आणि १३१ चेंडू शिल्लक राखत जिंकला होता.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात झालेले वनडे सामने सर्वाधिक चेंडू शिल्लक राखत लागले निकाल
१८८ – भारत, २०२२ (द ओव्हल)
१३५ – इंग्लंड, २०१५ (ब्रिसबेन)
१३१ – भारत, २०१३ (रांची)
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना १४ जुलैला लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हे नवीनच! टॉवेलमुळे गोलंदाजाच्या मेहनतीवर फिरले पाणी, बाद झालेला फलंदाज राहिला नाबाद
सर्वोत्तम बहुमान, जगातला नंबर ‘वन’! बुमराहची आयुष्यात कधीच विसरता न येणारी कामगिरी
दक्षिण आफ्रिकेचं टेन्शन वाढलंय! आयसीसी विश्वचषक २०२३ मधून बाहेर होण्याची शक्यता