सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलिया संघाच्या विजयाच्या आशा मावळल्या आहेत. भारताने पहिले दोन्ही सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. उभय संघांतील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तिसऱ्या कसोटीआधी ऑस्ट्रेलियन संघासाठी दोन मोठ्या बातम्या समोर आल्या.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड () तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात देखील खेळू शकरणार नाही. हेजलवुडला या बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियन संघात निवडले गेले होतो, पण दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यात तो खेळला नाही. अशातच आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या माहितीनुसार हेजलवुड या संपूर्ण मालिकेतून माघार घेत आहे. ऑस्ट्रेलियासा संघासाठी दुसरा बातमी आनंदाजी म्हणता येईल. त्यांचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार () आणि अष्टपैलू कॅमरून ग्रीन (Cameron Green) यांचे संघातील पुनरागमन निश्चत आहे. हे दोन्ही खेळाडू तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पूर्णपणे फिट अशल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सांगितले गेले आहे.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दिसऱ्या कसोटी सामन्याताला अजून 10 दिवस वेळ आहे. उभय संघांतील हा सामना 1 मार्च रोजी इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी तिसऱ्या कसोटीचे आयोजित धरमशाला स्टेडियमवर केले गेले होते. पण खेळण्यासाठी मैदान तयार नसल्यामुळे सामना इंदोरला हलवण्यात आला. स्टार्क आणि ग्रीन तिसऱ्या कसोटीसाठी फिट झाले असले, तरी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मात्र तिसऱ्या कसोटीपूर्वी मायदेशात परतला आहे. रविवारी (19 फेब्रुवारी) दिल्ली कसोटीत मिळालेल्या पराभवानंतर कमिन्स मायदेशासाठी रवाना झाला. वैयक्तिक कारणास्तव त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले गेले आहे. अशात इंदोर कसोटीपूर्वी तो पुन्हा संघात सामील होणार की नाही, हे लवकरच समजू शकते.
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारताला ही मालिका नावावर करणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे भारताने 4-0 अशा अंतराने ऑस्ट्रेलिया मात दिली, तर ऑस्ट्रेलियन संघा अंतिम सामन्यातील स्थान गमावू शकतो. याच पार्श्वभूमीवर उभय संघांतील पुढेचे दोन्ही सामने निर्णायक ठरतील. तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेविड वॉर्नर देखील मायदेशात परतू शकतो. वॉर्नरला दिल्ली कसोटीदरम्यान चेंडू लागलून दुखापत झाली होती. (Josh Hazelwood ruled out of the BGT 2023 Cameron Green & Mitchell Starc is 100% fit for the 3rd Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लागोपाठ दोन पराभवाने ऑस्ट्रेलिया संघात भूकंप, कर्णधार मायदेशी परतला, आता पुढे काय? वाचा सविस्तर
केएल राहुलला सोडावे लागले उपकर्णधारपद, रोहितकडून ‘या’ तिघांपैकी एकाला मिळणार मोठी जबाबदारी