इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स आगामी वनडे विश्वचषक खेळणार आहे. मागच्या वर्षी स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच त्याने ही निवृत्ती मागे देखील घेतली आहे. स्टोक्स संघात परतल्यामुळे इंग्लंड संघ भक्कम झाला आहे. मात्र, हॅरी ब्रूकला विश्वचषक संघातील स्थान गमावावे लागले. याविषयी ब्रूकने नुकतीच आपली भूमिका स्पष्ट केली.
हॅरी ब्रूक (Harry Brook) याने मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मागच्या एका वर्षात तो इंग्लंड संघाचा नियमित भाग बनला होता. पण वनडे क्रिकेटमध्ये त्या यावर्षी जानेवारी महिन्यात पदार्पणाची संधी मिळाली. तीन वनडे सामन्यांमध्ये त्याने 28.66च्या सरासरीने 86 धावा केल्या आहेत. मात्र ब्रूकची टी-20 आणि कसोटी आकडेवारी अधिक चांगली पाहायला मिळते. आगामी वनडे विश्वचषकात ब्रूक इंग्लंडसाठी मॅच विनर ठरू शकतो होता, जे यापूर्वी त्याने केले आहे. पण बेन स्टोक्स (Sean Stokes) याने वनडे निवृत्ती मागे घेतल्यामुळे ब्रूकला विश्वचषकात संधी मिळण्याची शक्यता नाहीये. अशात इंग्लंडच्या या युवा फलंदाजाने आपली प्रतिक्रिया दिली.
नुकत्याच दिलेल्या एखा मुलाखतीत हॅरी ब्रूक म्हणाला, “हे नक्कीच निराशाजनक आहे, पण मी यावर काहीच करू शकत नाही. आपल्याला यातून पुढे जावे लागणार आहे. मी याविषयी कमी विचार करण्याचा प्रयत्न करत आहे. मॅथ्यू मॉट्स किंवा जोस बटलर यांच्याशी माझी जास्त चर्चा झाली नाहीये. पण त्यांनी आधीच सांगितले होते की, स्टोक्सच्या पुनरागमनानंतर मला या संघातून वगळले जाऊ शकते. तो आतापर्यंतच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्यामुळे मी खरोखर याविषयी कुठलीच तक्रार करणार नाही, मी करू शकतो का?”
“सध्या मी चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे जाणवत आहे. त्यामुळेच संघासाठीही मी महत्वाचे योगदान देऊ शकतो, असे मला वाटते. एकदिवस क्रिकेट खेळण्याची मला जास्त संधी मिळाली नाही. मग ते यॉर्कशायर संघासाठी असो किंवा इंग्लंड संघासाठी. पण टी-20 क्रिकेट मी मोठ्या प्रमाणात खेळलो आहे,” असेही ब्रूक पुढे म्हणाला.
दरम्यान, मागच्या वर्षी बेन स्टोक्स इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बनला होता. यामुळेच वर्कलोडचे कारण देत त्याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण विश्वचषकाच्या तोंडावर कसोटी कर्णधाराने वनडे निवृत्ती मागे घेणे अनेकांसाठी रोमांचक ठरले. येत्या 5 ऑक्टोबर रोजी वनडे विश्वचषक सुरू होत आहे. भारतात खेळली जाणारी ही क्रिकेट स्पर्धा 19 नोव्हेंबर रोजी संमाप्त होईल. (Brook’s reaction after missing the opportunity of the World Cup! Said, ‘With Stokes coming into the team, I…’)
महत्वाच्या बातम्या –
World Cupपूर्वीच ‘दादा’ची भविष्यवाणी, भारतासह ‘हे’ 5 संघ असतील विश्वचषकाचे दावेदार; पाहा यादी
मिनी ऑरेंज आयटीएफ पॅरा ट्रायथलॉन चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत महाराष्ट्राच्या अथर्व पाटील याला विजेतेपद