इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा थरार पाहायला मिळत आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी (३ सप्टेंबर ) देखील पुन्हा एकदा मैदानात जार्वोची एन्ट्री झाल्याचे पहायला मिळाले होते. जार्वो नावाची जर्सी घातलेला एक व्यक्ती मैदानात येण्याची ही तिसरी वेळ होती. दरम्यान या घटनेनंतर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने एक मजेशीर मिम्स शेअर करत इंग्लंडच्या सुरक्षा यंत्रणेची खिल्ली उडवली आहे.
यापूर्वी देखील इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत दोन वेळेस जार्वोने मैदानात प्रवेश केला होता. त्यावेळी व्यवस्थापकांनी स्पष्ट केले होते की, जार्वो कुठ्ल्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात दिसून येणार नाही. तरीदेखील चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा एकदा मैदानात प्रवेश केला आहे. यावेळी प्रवेश तर केलाच पण, तो गोलंदाजीसाठी रनअप घेताना दिसून आला. तसेच त्याने नॉन स्ट्राइकला असलेल्या जॉनी बेअरस्टोला देखील धडक दिली.
या घटनेनंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डच्या व्यवस्थापनावर देखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दरम्यान, वासिम जाफर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक मीम शेअर केला आहे. ज्यामध्ये एक सिक्यूरिटी गार्ड कोणत्याही गांभीर्याशिवाय लोकांना तपासताना दिसत आहे. या व्हिडिओवर त्यांनी कॅप्शन म्हणून, “इंग्लंडच्या मैदानावर असलेले सेक्युरीटी गार्ड”, असे लिहिले आहे. या मीमद्वारे त्यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केला आहे.(Wasim jaffer made fun of Cricket england on jarvo’s entry, watch funny video)
Security guards at English grounds: #Jarvo #EngvInd pic.twitter.com/0TE4S4vmS5
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) September 3, 2021
यॉर्कशायर क्रिकेटने केली होती कारवाई
हेडिंग्लेचे मैदान हे यॉर्कशायर क्रिकेट संघाचे घरचे मैदान आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना हेडिंग्लेच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात देखील जार्वोने एन्ट्री केली होती. ज्यामुळे यॉर्कशायर क्रिकेटने जार्वोवर कारवाई केली होती. त्यांनी जार्वो वर आर्थिक दंड ठोठावला होता.तसेच आयुष्यभर या मैदानावर न येण्याची कारवाई केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
ओव्हलच्या मैदानावर उमेश यादवचा मोठा कारनामा! ‘या’ विक्रमाच्या बाबतीत केली जहीर खानची बरोबरी
ऑली पोपने शार्दुलला दिला चांगलाच चोप, एकाच षटकात ठोकले सलग ४ चौकार, पाहा व्हिडिओ
टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी पाकिस्तानी कर्णधाराकडून वाकयुद्धास सुरुवात; म्हणाला…