कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अशामध्ये सर्व क्रीडास्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व क्रिकेटपटू आपापल्या परिवारासोबत घरात वेळ घालवत आहे. तसेच काही खेळाडू आता आपल्या घरात बसून सोशल मीडियावर जास्त सक्रिय झालेले दिसतात.
तसेच आपल्या चाहत्यांशीही सोशल मीडियावर जोडले गेले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) नुकतीच माहिती दिली की, तो गुरुवारी (२ एप्रिल) संध्याकाळी ७ वाजता इंग्लंड संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसनबरोबर (Kevin Pietersen) इंस्टाग्रामवर लाईव्ह येणार आहे.
सध्या प्रत्येक खेळाडू आपापल्या घरात आराम करत आहेत. तसेच स्वत: ला व्यस्त ठेवण्यासाठी वेगवेगळी कामेही करत आहेत.
विराटने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केले की, “मी पीटरसनबरोबर गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता इंस्टाग्रामवर लाईव्ह येणार आहे. तुम्ही यामध्ये सामील व्हा. आम्ही जेव्हापासून एकमेकांना ओळखतो तेव्हापासूनच्या आणि सध्याच्या परिस्थितीबद्दल चर्चा करणार आहोत.”
Tomorrow at 7 PM IST my good friend @KP24 and I are going live on Instagram. Tune in to catch us chatting about what's happening world over at the moment and also about all the years we've known each other. 😊 pic.twitter.com/19ghv6Bp1B
— Virat Kohli (@imVkohli) April 1, 2020
अशाच पद्धतीने पीटरसननेही आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केले की, “मी उद्या (२ एप्रिल) ७ वाजता विराटबरोबर चर्चा करणार आहे. तुम्ही ही संधी गमावू नका. विराटने माझी विकेट घेतली होती. त्यामुळे तो मला चिडवत असतो.”
https://twitter.com/KP24/status/1245343949247647744
यापूर्वी पीटरसनने भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माबरोबरही (Rohit Sharma) इंस्टाग्रामवर लाईव्ह चॅट (Instagram Live Chat) केले आहे.
महा स्पोर्ट्स टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@MahaSports) जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी मिळवा.
ट्रेंडिंग घडामोडी –
–३ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ज्यांनी केले आहे महिला क्रिकेटरशी लग्न
–१० भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी व त्या करत असलेलं काम
–घटस्फोटीत महिलांशी लग्न करणारे ५ भारतीय क्रिकेटर्स
–दोन वेळा लग्न केलेले १२ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, ५ नावे आहेत भारतीय
–आणि झाली शिखर धवनची लव्हस्टोरी सुरु