भारतीय क्रिकेट संघाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीचे कसोटी मध्ये पदार्पण करुन आज 13 वर्ष पूर्ण झाले आहेत. या दरम्यान कोहलीने टीम इंडियासाठी मोलाचे योगदान दिले आहे. विराटने 20 जून 2011 रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध किंग्स्टन येथे आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात 15 धावा केल्या होत्या.
RCB SPECIAL POSTER FOR KING KOHLI COMPLETING 13 YEARS IN TEST CRICKET 🐐 pic.twitter.com/NT2XbsIjCb
— Johns. (@CricCrazyJohns) June 20, 2024
विराट कोहली हा भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून उदयास आला. त्याने कसोटी कर्णधारपदात एमएस धोनीसह अनेक दिग्गज कर्णधारांना मागे सोडले. एमएस धोनीनंतर किंग कोहलीने भारतीय कसोटी संघाची कमान सांभाळली. कोहली कर्णधार होण्यापूर्वी धोनी टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार होता. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 60 पैकी 27 कसोटी जिंकल्या. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 68 पैकी 40 कसोटी सामने जिंकले. कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सर्वाधिक कसोटी सामने जिंकले. कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी करिअरला सुरुवात केली आणि आत्तापर्यंत त्याने लाल चेंडूचे 113 सामने खेळले आहेत. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघात अनेक बदल पाहायला मिळाले.
विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमध्ये कामगिरी
113 कसोटी
8,848 धावा
49.16 सरासरी
29 शतके.
7 द्विशतके
कर्णधार म्हणून 40 कसोटी सामने विजय
कोहलीने टीम इंडियासाठी आतापर्यंत 113 कसोटी खेळल्या आहेत. या सामन्यांच्या 191 डावांमध्ये त्याने 49.16 च्या सरासरीने 8848 धावा केल्या. या दरम्यान त्याने 7 द्विशतकांसह 29 शतके आणि 30 अर्धशतके झळकावली. कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 254* धावा होती. आतापर्यंत त्याने कसोटीत 26 षटकार आणि 991 चौकार मारले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीच्या नावावर अनेक विक्रम आहेत. कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळणारा कोहली क्रिकेट विश्वातील सहावा खेळाडू आहे. कोहलीने कर्णधार म्हणून 68 कसोटी सामने खेळले. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ अव्वल स्थानावर आहे, ज्याने कसोटी कर्णधार म्हणून 109 सामने खेळले.
महत्तवाच्या बातम्या-
गतविजेत्या इंग्लंडनं यजमान वेस्ट इंडिजला चारली धूळ; 8 विकेट्सनी मिळवला एकतर्फी विजय
सुपर 8च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 18 धावांनी शानदार विजय!
भारताची एकदिवसीय मालिकेत 2-0 ने आघाडी, स्मृती मानधाना, हरमनप्रीत कौरचे झंझावाती शतक