भारताचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्याला 3 जुलैपासुन टी20 मालिकेने सुरुवात झाली. परंतू त्यापुर्वीच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्याने भारताला मोठा धक्का बसला होता.
बुमराह 27 जूनला आयर्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या टी20 सामन्यादरम्यान डावा आंगठा फ्रॅक्चर झाल्याने इंग्लंड विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे.
त्यामुळे आता 12 जुलैपासुन सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेसाठी त्याच्या ऐवजी मुंबईच्या शार्दुल ठाकुरची निवड करण्यात आली आहे.
शार्दुलची मागील काही दिवसांपासुन चांगली कामगिरी होत आहे. त्याने यावर्षीच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. तसेच त्याने इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारत अ संघाकडून चांगला खेळ केला आहे.
भारत अ संघाकडून खेळताना मागच्या चार सामन्यात त्याने 8 विकेट्स घेऊन सर्वांचे लक्ष वेधले होते. तसेच त्याची यावर्षीच्या सुरवातीला झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही भारतीय संघात निवड करण्यात आली होती.
Jasprit Bumrah will now miss India's ODI series against England, with @imShard called up as his replacement.
➡️ https://t.co/FKvF9CiN4c pic.twitter.com/x73Zc5nBFX
— ICC (@ICC) July 6, 2018
बीसीसीआयच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की बुमराहवर बुधवारी, 4 जुलैला लीड्स शहरात सर्जरी करण्यात आली आहे. त्यानंतर तो भारतात परताला असुन बीसीसीआयचे वैद्यकीय स्टाफ त्याच्या दुखापतीची देखरेख करतील.
बुमराहला 3 जुलैपासुन सुरु झालेल्या टी20 मालिकेलाही मुकावे लागले आहे. टी20 मालिकेत त्याच्या ऐवजी भारतीय संघात दिपक चहरला संधी देण्यात आली आहे.
वॉशिंग्टन सुंदरही मर्यादीत षटकांच्या मालिकेला मुकणार:
बुमराहप्रमाणे वॉशिंग्टन सुंदरला उजव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तोही इंग्लंड विरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या ऐवजी टी20 संघात कृणाल पंड्याला तर वनडे संघात अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
-धोनीसाठी ५००वा सामना तर विराटला जगातील सर्वात खास विक्रम करण्याची संधी
-भुवनेश्वर-कुलदीप हे वागणं बरं नव्हे; इंग्लंडचा क्रिकेटपटू कडाडला
-पृथ्वी शॉची टीम इंडियाकडून धमाकेदार कामगिरी सुरुच…