ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात बुधवारी (2 नोव्हेंबर) भारत आणि बांगलादेश (INDvBAN) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशसमोर विजयासाठी 185 धावांचे आव्हान ठेवले. सात षटकानंतर पावसामुळे खेळ थांबल्याने बांगलादेश समोर नवे आव्हान उभे केले गेले आहे.
भारतीय संघाने दिलेल्या 185 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशसाठी लिटन दास व शांतो यांनी आक्रमक सलामी देताना 7 षटकात 66 धावा चोपल्या. दासने केवळ 21 चेंडूंवर अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर आलेल्या पावसामुळे जवळपास अर्ध्या तासांपेक्षा जास्त वेळेचा खेळ वाया गेला.
पाऊस थांबल्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार, बांगलादेश समोर विजयासाठी 16 षटकात 151 धावांचे आव्हान देण्यात आले. म्हणजेच पुढील 9 षटकात बांगलादेशला 85 धावांची गरज असेल. तर भारतासाठी केवळ एक गोलंदाज चार षटके गोलंदाजी करू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एका चेंडूने बनवले व्हिलन एकाने हिरो! जीवदान मिळाल्यावर दोन चेंडूच टिकू शकला रोहित
बांगलादेश बनला टॉसचा बॉस! टीम इंडियाला फलंदाजीचे आमंत्रण; संघात महत्त्वपूर्ण बदल