बहुप्रतिक्षीत इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) पाचवा कसोटी सामना आज (१ जुलै) सुरू होणार आहे. मागील वर्षी सुरू झालेल्या या कसोटी मालिकेतील चार सामने खेळले गेले असून शेवटचा सामना कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता. तेव्हा भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना २-१ असा पुढे होता. यावेळी अनेक गोष्टींमध्ये बदल झालेला दिसेल. दोन्ही संघाचे कर्णधार आणि प्रशिक्षक बदलेले असून आयसीसीनेही (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) काही नवीन नियम लागू केले आहेत.
स्टम्पमध्ये लावलेला कॅमेरा आपण पाहिला आहे. आता तर एजबॅस्टन कसोटी, बर्मिंघम येथे होणाऱ्या या कसोटी सामन्यामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटमध्ये कॅमेरा लावलेला दिसणार आहे. शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटमध्ये कॅमेरा लावला जाणार आहे. प्रथमच कसोटीमध्ये हा प्रयोग केला जाणार असून त्याला आयसीसी आणि इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डने मंजुरी दिली आहे.
या सामन्याचे प्रसारक स्काय स्पोर्ट्स हे असून त्यांनी ही शक्कल लढवली आहे. जेणेकरून प्रेक्षकांना यामधून सामान एका वेगळ्याच दृष्टीने पाहायला मिळेल. या कॅमेरामध्ये आवाज ऐकू नाही येणार नसल्याने प्रेक्षकांना गोधंळाचा त्रास होणार नाही. स्कायने याच्याआधी हा प्रयोग द हंड्रेड लीगमध्ये केला होता. तेथे सर्वप्रथम फलंदाज-यष्टीरक्षक टॉम मूरेसने यष्टीरक्षण करताना हेल्मेटवर कॅमेरा लावला होता. त्याचबरोबर बिग बॅश लीगमध्येही याचा प्रयोग करण्यात आला आहे.
या सामन्यासाठी जो कोणता खेळाडू हेल्मेटवर कॅमेरा लावून मैदानात उतरेल आंतरराष्ट्रीय स्तरावर तो पहिलाच खेळाडू ठरणार आहे. इंग्लंडच्या संघाने अंतिम अकरा जणांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये ओली पोपचा समावेश असून तो क्षेत्ररक्षणासाठी शॉर्ट लेगला असतो. त्यामुळे तो हेल्मेटवर कॅमेरा लावून मैदानात उतरेल. बेन स्टोक्स (Ben Stokes) हा कर्णधार असून अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसन याचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याच्या नावावर कसोटीमध्ये ६५० विकेट्स आहेत.
भारताने रोहित शर्मा (Rohit Sharma) कोरोनामुळे उपलब्ध नसल्याने जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)याच्याकडे नेतृत्वाची कमान सोपवली आहे. तसेच इंग्लंड संघासाठी ब्रेंडन मॅक्युलम आणि भारताच्या संघासाठी राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यावर मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी आहे. भारताच्या प्रमाणवेळेनुसार सामन्याला दुपारी ३ वाजता सुरूवात होणार आहे.
मालिका विजयाच्या दृष्टीने भारताला हा सामना अनिर्णित किंवा जिंकावा लागेल. इंग्लंड संघाला हा सामना मालिका विजयासाठी जिंकावाच लागणार आहे. भारताचा एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंडचा इतिहास आणि सध्याच्या इंग्लंड संघाची कामगिरी पाहता सामना जिंकणे सोपे नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Fifth Test: भारताकडे १५ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी, तर इंग्लंडचा ब्रॉडही रचू शकतो इतिहास
भारतासाठी ऍजबस्टन कसोटी महत्त्वाची, जाणून घ्या कसे आहे टेस्ट चँपियनशीप फायनलपर्यंत पोहोचण्याचे गणित
विराटवर पुन्हा ‘ती’ दणकेबाज खेळी खेळण्याची जबाबदारी, जिंकून देऊ शकतो निर्णायक कसोटी